Vastu Tips For Mirror: घरात पैसा यावा म्हणून कुठे लावावा आरसा? काय सांगतं शास्त्र

वास्तू शास्त्रानूसार घरात कोणत्या दिशेला लावावा आरसा?
Vastu Tips For Mirror: घरात पैसा यावा म्हणून कुठे लावावा आरसा? काय सांगतं शास्त्र
Updated on

 Vastu Tips For Mirror: घर बांधाताना जसे वास्तू शास्त्राचे अनेक नियम पाळले जातात. घरातील टॉयलेट, किचन, पाणी साठवण्याची जागा कोणत्या दिशेला असावी याचे नियम कटाक्षाने पाळले जातात. पण, घरातील वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात याबद्दल फार काळजी घेतली जात नाही.

घरात चुकीच्या जागी ठेवलेल्या वस्तू तुमच्या घराची पॉझिटीव्ह एनर्जी संपवत असतात. आता आरशाचेच घ्या ना. प्रत्येकाच्या घरात हॉल, किचन, बाथरूम, बेसिन, बेडरूम अशा प्रत्येक ठिकाणी आसरे लावलेले असतात. आपण कसे दिसतो हे पाहण्यासाठी आरसा लावाला जातो.

आरसा जर चुकीच्या पद्धतीने लावला तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळेच वास्तू शास्त्रानूसार घरात आरसा कोणत्या ठिकाणी लावावा हे पाहुयात.

Vastu Tips For Mirror: घरात पैसा यावा म्हणून कुठे लावावा आरसा? काय सांगतं शास्त्र
Vastu Tips for Negative Energy : तुमच्या 'या' अगदी निव्वळ चुका अन् घरात येते नकारात्मक ऊर्जा

आरसा कोणत्या दिशेला लावावा

घराच्या पूर्वे आणि उत्तर दिशेकडील भिंतींवर आरसा लावावा. तो जास्त पॉझिटीव्ह एनर्जी देतो. तर आसरा कधीही दक्षिण किंवा पश्चिम भिंतींवर लावू नये. यामुळे घरात अशुभ संकेत यायला सुरू होतात.

आरसा इथे लावावा

डायनिंग एरियामध्ये, डायनिंग टेबलच्या अगदी समोर आरसे लावावेत. जेणेकरून जेवण करताना. संपूर्ण कुटुंब आरशात एकत्र जेवण करताना दिसेल. यामुळे घरात समृद्धी येते. कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम आणि आपुलकी वाढते. त्यांच्यात कधी कलह होत नाहीत.

कोणत्या आकाराचा आरसा लावावा

वास्तुशास्त्रानुसार चौरस आणि आयताकृती आकारांचा आसरा लावावा. प्राधान्य दिले जाते कारण ते समान रीतीने ऊर्जा पसरवतात. ओव्हल आणि मंडळे सर्वोत्तम मानली जात नाहीत आणि टाळली पाहिजेत. वापरावयाच्या आरशाच्या आकारावर कोणतेही बंधन नसले तरी कोणताही अनियमित आकार टाळावा.

Vastu Tips For Mirror: घरात पैसा यावा म्हणून कुठे लावावा आरसा? काय सांगतं शास्त्र
Vastu Tips : घरात अडचणींचा डोंगर कोसळलाय, वास्तू दोष तर नाही ना? असं करा चेक!

आसरा चौकोन आयताकृती कारातील असेल. तर त्यामुळे घरात सर्वात जास्त पॉझिटीव्ह एनर्जी येते. पण आसरा गोलाकार आणि दंडाकृती नसावा. त्यामुळे घरात अडचणी वाढतात.

आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी

घराची आर्थिक परिस्थिती बिघडत चालली असेल. तर त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत असाल. तर आरसा तुम्हाला मदत करेल. तुमच्या लॉकरमध्ये आरसा ठोवा, पण, त्यातून तुमचे धन दिसेल असेच तो छोटा आरसा ठेवा. त्यातून रिफ्लेक्ट होणारे पैसे हे विकृत पद्धतीने दिसू नयेत स्पष्ट दिसतील याची काळजी घ्या.

पैसे वाढण्यासाठी आरसा तिजोरीत ठेवा
पैसे वाढण्यासाठी आरसा तिजोरीत ठेवाesakal
Vastu Tips For Mirror: घरात पैसा यावा म्हणून कुठे लावावा आरसा? काय सांगतं शास्त्र
Vastu Tips : चिमूटभर अक्षता घालवतील तुमचा वास्तू दोष अन् होईल भरभराट

बेडरूममध्ये आरसा लावताना

मास्टर बेडरूम दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला आरशाची जागा असावी. या दिशेला पृथ्वी तत्वाचे वर्चस्व असते. तर, आरसा हा पाण्याचा घटक आहे आणि तो अस्थिरतेशी संबंधित आहे. वास्तूनुसार, या खोलीत आरसा लावणे योग्य नाही कारण ते पृथ्वीच्या घटकांच्या शक्तींमध्ये व्यत्यय आणेल आणि गोंधळ निर्माण करेल.

तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण करू शकतो. विशेष म्हणजे आरसा तुटलेला ,फुटलेला, टोकदार, भेगा पडलेला, वाकडा तिकडा असा नसावा याची खास खबरदारी घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.