Vastu Tips : घरातल्या सगळ्या अडचणी दूर करते एक चुटकी नमक; कसे वापरायचे ते पहा!

मिठाला नेहमीच नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी मानले गेले
Vastu Tips
Vastu Tipsesakal
Updated on

Vastu Tips : घर कितीही वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलं तरी काही ना काही अडचणी निर्माण होतच असतात. त्यावर वास्तुदोष निवारणासारखे विविध प्रकार करूनही प्रश्न सुटत नाहीत. अशावेळी घरातील एक छोटी वस्तू तुम्हाला मदत करेल.

घरातील किरकोळ भांडणे टाळण्यासाठी पती-पत्नीमधील मतभेद दूर करण्यासाठी किचनमधील एक पदार्थ तुमच्या कामी येईल. मीठ खूप प्रभावी ठरू शकते.

आपल्या सगळ्या घराची वास्तू पूर्णपणे नकारात्मक व सकारात्मक उर्जेने व्यापलेली असते. घरात अशा काही वस्तू असतात त्यातून सकारात्मक उर्जा मिळते आणि नकळतपणे काही असे दोष असतात त्यामुळे नकारात्मक उर्जेला प्रोत्साहन मिळते. (Vastu Tips : A pinch of salt can remove these problems from your home just know how to use it)

Vastu Tips
Vastu Tips : वास्तू शास्त्रानुसार घरात कोणत्या टाइल्स बसवाव्यात, त्यांचे रंग कोणते असावेत?

हेच दोष दूर करण्यासाठी वास्तूत काही उपाय सांगितले गेले आहेत. आज यातला उपाय जाणून घेऊया. हे आहेत मीठाचे उपाय. वास्तूत मीठाचा उपयोग नकारात्मक उर्जा नष्ट करण्यासाठी केला जातो. मीठाचे काही सोपे आणि फायदेशीर उपाय पाहुयात. (Vastu Tips)

बेडरुमच्या एका कोपऱ्यात रॉक सॉल्ट किंवा स्टँडिंग सॉल्टचा तुकडा घ्या आणि हा तुकडा महिनाभर त्याच कोपऱ्यात ठेवा. एक महिन्यानंतर जुन्या मिठाचा तुकडा काढून टाका आणि नवीन तुकडा ठेवा, असे केल्याने घरामध्ये शांतता राहील आणि किरकोळ वाद कमी होतील.

वास्तूनुसार, जर तुमच्या घरातील कोणताही सदस्य आजारी असेल तर रुग्णाच्या पलंगाच्या डोक्यावर एका भांड्यात सेंधानाचे काही तुकडे ठेवा. लक्षात घ्या की रुग्णाचे डोके पूर्वेकडे असावे.(Salt)

रुग्णाच्या जेवणात फक्त रॉक मीठ किंवा काळे मीठ वापरावे, तर सामान्य मिठाचा वापर कमीत कमी करावा. असे केल्याने रुग्णाची तब्येत लवकर सुधारू लागते. अशा प्रकारे घरातील अशांत वातावरणही शांत होऊ लागेल.

Vastu Tips
Bathroom Vastu Tips: घरात शांतता हवीय?, केवळ घरच नाहीतर बाथरूमही शास्त्राप्रमाणेच असावं लागतं!

मिठाला नेहमीच नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी मानले गेले आहे. म्हणून मिठा वाईट दृष्ट काढण्यासाठी केलं जातं. आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला किंवा घराला दृष्ट लागल्याचे जाणवत असल्यास चिमूटभर मीठ तीन वेळा ओवाळून बाहेर फेकून द्यावे. याने नजर दोष नाहीसा होतो.

वास्तु विज्ञानाप्रमाणे काचेच्या बॉऊलमध्ये मीठ भरून शौचालय आणि स्नान गृहात ठेवावे याने वास्तुदोष दूर होतं. याचे कारण म्हणजे मीठ आणि काच दोन्ही राहूच्या वस्तू असल्याने अशा प्रकारे राहूचं नकारात्मक प्रभाव दूर करण्यात मदत मिळते.

राहूला नकारात्मक ऊर्जा आणि कीटक व कीटाणूंचा कारक मानले गेले आहे. आणि यामुळे घरातील सुख- समृद्धी आणि आरोग्यावर प्रभाव पडतो. काचेच्या बरणीत मीठ भरून घराच्या कोपर्‍यात ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. राहू, केतूची दशा सुरू असल्यास मनात वाईट विचार तसेच भीती निर्माण होते अशावेळी हा प्रयोग अत्यंत लाभदायक ठरतो.

Vastu Tips
Vastu Tips for Wealth: काही केल्या पैसा टिकत नाही, मग पर्स मध्ये ठेवा या वस्तू आणि पहा कमाल

मिठाचे खडे लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून घराच्या मुख्य दाराला बांधल्याने घरात वाईट शक्ती प्रवेश करत नाही. व्यवसायात प्रगतीसाठी मुख्य दारावर आणि तिजोरीवर अशी पोटली बांधून लटकवणे योग्य ठरेल.

रात्री झोपताना पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून हात पाय धुण्याने ताण दूर होतो आणि चांगली झोप येते. राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव देखील याने दूर होतो. मीठ कधीही कुणाला देऊ नये किंवा घेऊ नये. त्यामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होतात. (Vastu shashtra Upay)

मीठही वाया जाऊ नये. अन्यथा, तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मीठाने घर पुसल्याने वास्तुदोष दूर होतात. बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.