Vastu Tips : समस्या अनेक उपाय फक्त एक, भगवान शंकरांचा फोटो करेल तुमच्या अनेक समस्यांच निवारण!

समस्या अनेक उपाय फक्त एक ‘हर हर भोले’
Vastu Tips
Vastu Tipsesakal
Updated on

Vastu Tips : जिथे आपल्या अडचणींचे काहीच समाधान मिळत नाही. तिथे देवाच्या दारावर आपल्याला उत्तर मिळतं. आता श्रावण महिन्याला सुरूवात झालीय. भगवान शंकर भक्तीच्या भुकेले आहेत. त्यांना तुम्ही एका कलशातून जल अर्पण केलं तरी ते प्रसन्न होतात. तुम्ही शुद्ध मनाने वाहिलेलं एक पांढरं फुलही शंकरांना प्रसन्न करतं.

आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. भगवान शिवाची उपासना केल्याने सुख, शांती, आरोग्य आणि लाभ मिळतात आणि ग्रह दोषही दूर होतात. सावनमध्ये शिव परिवाराची उपासना केल्याने वैवाहिक आणि संतती सुखासह सुख आणि सौभाग्य प्राप्त होते.

भगवान शिव-पार्वतीसोबत गणपती आणि कार्तिकेयची पूजा केल्याने धन आणि धान्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. ज्या घरामध्ये शिव परिवाराची मूर्ती किंवा चित्र असेल त्या घरात वास्तुदोष नसतो. (Vastu Tips : According to Vastu, which form of Lord Shiva should be placed to fulfill any wish)

Vastu Tips
Shravan 2023 Healthy Recipes: पावसाळ्यात हेल्दी राहण्यासाठी कुट्टूचं पीठ फायदेशीर, श्रावणात उपवासासाठी करा कुट्टूच्या पीठाच्या विविध रेसिपी

उत्तर दिशा ही भगवान शंकराची आवडती दिशा आहे आणि याच दिशेला भगवान शिवाचे निवासस्थान आहे. म्हणूनच घरामध्ये भगवान शिवाचे चित्र लावण्यासाठी उत्तर दिशा निवडली पाहिजे. या दिशेला चित्र लावल्याने शुभ फळ मिळते. कोणत्या इच्छेसाठी कोणत्या प्रकारचे चित्र लावायचे ते जाणून घेऊया.

रोग प्रतिबंधासाठी

रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शंकराचे असे चित्र ज्या घरात अष्टांग मुद्रेत असेल त्या घरात ठेवावे. म्हणजे एका पायावर उभे राहून त्रिनेत्राबरोबरच चार हातात डमरू आणि त्रिशूलही असावे. भगवान शंकराच्या अशा स्वरूपाचे चित्र उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते.

वैवाहिक जीवनात आनंदासाठी

सावन मध्ये भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीची अशी मूर्ती किंवा चित्र घरात बसवावे, ज्यामध्ये ते नंदीवर प्रसन्न मुद्रेत बसलेले असतात. तसेच अर्धनारीनटेश्वराच्या स्वरूपातील पूजा केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते.(Lord Shiv)

Vastu Tips
Shravan Maas 2023 : श्रावण सोमवारच्या व्रताची परंपरा 21 ऑगस्टपासून; जाणून घ्या श्रावणी सोमवार व्रत कसे करावे...

अभ्यासात मन लागण्यासाठी

विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यास कक्षाच्या उत्तर दिशेला भगवान शिवाची उपदेशाची मूर्ती किंवा चित्र लावावे. परमेश्वराच्या या रूपाची पूजा केल्याने ज्ञान आणि विद्येचे आशीर्वाद प्राप्त होतात.

प्रसिद्धीझोतात येण्यासाठी

आपली प्रतिष्ठा आणि सन्मान राखण्यासाठी माणसाने त्या भगवान शिवाच्या मूर्तीची किंवा चित्राची पूजा केली पाहिजे ज्यामध्ये त्याच्या सर्व गणांसह नंदी आणि देवी पार्वती आहेत.

Vastu Tips
Shravan 2023 : तूम्ही एक महिना कांदा लसूण खाऊ नका, बघा किती फायदे आहेत ते!

घरात सुख येण्यासाठी

आपण जे काही करतो ते सुखी राहण्यासाठी करतो. जर तुम्हालाही घरात शांती, समाधान हवी असेल तर घरात शंकर देवी पार्वती मातेसोबत असलेला फोटो किंवा चित्र तुम्ही लावू शकता. यामुळे घरात अनेक सकारात्मक बदल होतात.

मनाच्या शांतीसाठी

जर तुमच्या डोक्यावर खूप कर्ज असेल, किंवा कोणत्याही गोष्टीचा ताण असेल तर ही समस्याही भगवान शंकर दूर करू शकतात. या समस्येसाठी भगवान शिव ध्यान करत असलेले चित्र घराच्या उत्तर दिशेला लावावे. या फोटोत शंकरांच्या डोक्यावर चंद्र असलेला. आणि केसांतून गंगा वाहतेय असा फोटो लावावा.

Vastu Tips
Shravan 2023 : एका सासऱ्याला होता स्वत:च्याच जावयाचा तिटकारा, ते राजा दक्ष कोण होते?

या गोष्टी लक्षात ठेवा

भगवान शंकरांच्या पूजेमध्ये पवित्रतेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे विवाहित जोडप्याच्या बेडरूममध्ये चुकूनही त्यांची मूर्ती किंवा चित्र लावू नका. त्याचे चित्र जिन्याखाली, स्वयंपाकघरात किंवा इतर कोणत्याही अपवित्र ठिकाणी लावू नये

अन्यथा घरात अशुभ परिणाम मिळू शकतात. भगवान शंकराचे तुटलेले फोटो, फुटलेल्या मूर्ती घरात ठेवणे टाळावे. तसेच, महादेवांचे क्रोधित रूप ठेवल्याने घरात अशांतता वाढू शकते. ज्या फोटोमध्ये शिवजी तांडव करत आहेत, तो फोटोही घरात ठेवू नये. (Shravan 2023)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.