Animal Statue Vastu : सगळं काही चांगलं असताना काहीतरी अडचणी येतच असतात. सतत नकारात्मकता वाढते आणि घरात काही गोष्टी चुकीच्या घडत असतात. बाहेरील लोकही चौकशी करा, वास्तू दोष नाहीसा करा असं सांगत असतात.
जर तुम्हालाही असे काही अनुभव येत असतील. तर, तुम्ही हे उपाय करू शकता. ज्यामुळे घरात धन-धान्याच्या राशी पडतील अन् तुमची होणारी प्रगती पाहुन शेजारी जळायला लागतील.
आज वास्तुशास्त्रामध्ये आपण हत्ती घरात ठेवल्याने काय होते याबद्दल बोलणार आहोत. वास्तूनुसार घरात हत्ती ठेवणे खूप शुभ असते. अनेक पूर्वेकडील संस्कृतींमध्ये हत्तीची पूजाही केली जाते.(Vastu Tips: Bring the idol of this animal today itself, there will be rain of wealth in the house, knowledge will also increase)
इंद्रदेवाची स्वारी हत्ती आहे. लक्ष्मी देवीच्या वाहनांपैकी एक पांढरा हत्ती आहे, म्हणजेच हत्तीची मूर्ती घरात ठेवणे खूप चांगले आहे. हे आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हे सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचे प्रतीक देखील आहे.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या किंवा कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हत्तींच्या जोडीची सोंड उंचावलेली मूर्ती ठेवावी. यामुळे कुटुंबात आनंद आणि सौभाग्य येते आणि नातेसंबंध मजबूत होतात. त्याच वेळी, कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये सामंजस्य असते आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. (Vastu Tips)
याशिवाय आर्थिक संकट टाळण्यासाठी विहिरीत हत्तीच्या पायाखालची माती टाकावी. पण जर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर त्या मातीला तूप आणि पाण्याने मळून 6 गोळ्या बनवा आणि त्यात सिंदूर टाका आणि एका डब्यात ठेवा आणि खोलीच्या नैऋत्य दिशेला लपवा.
दुसरीकडे, जर तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजय मिळवायचा असेल आणि लढाई न करता सर्व काही सोडवायचे असेल, तर तुम्ही लगाम हत्तीच्या माहुताला दान करा.
हे प्राणीही ठेवा
हंसांची जोडी
वास्तुशास्त्रानुसार ड्रॉईंग रूम किंवा बेडरूममध्ये दोन हंसांचे चित्र लावणे चांगले मानले जाते. असे म्हणतात की यामुळे पती-पत्नीचे वैवाहिक जीवन सुधारते. यासोबतच घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते.
मासे
वास्तुशास्त्रानुसार मासे संपत्ती आणि उर्जेचे प्रतीक मानले जाते. घरात पितळ किंवा चांदीचा मासा ठेवल्याने सुख-समृद्धी येते. यासोबत संपत्ती येते. घराच्या उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला ठेवणे शुभ असते. (Astro Tips)
गाय
शास्त्रानुसार गायीमध्ये सर्व देवी-देवता वास करतात असे मानले जाते. म्हणूनच गाईची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख, समृद्धी येते.
उंट
घरात उंटाची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. उंट हे संघर्ष आणि यशाचे प्रतीक आहे. घराच्या ड्रॉईंग रूम किंवा लिव्हिंग रूमच्या उत्तर-पश्चिम दिशेला ठेवल्याने करिअर किंवा व्यवसायात यश मिळते.
गाय वासराची मूर्ती
अनेक घरांमध्ये वासराला दूध पाजणारी कामधेनू गायीची मूर्ती असते. गायीची मूर्ती ठेवल्याने मूल होण्यासोबतच मनाला शांती मिळते. त्याचे महत्त्व फेंगशुईमध्ये देखील स्पष्ट केले आहे. अभ्यासात एकाग्रतेसाठी या मूर्तीची प्रतिष्ठापनाही घरामध्ये केली जाते.
धावणाऱ्या घोड्याची मूर्ती
वास्तू आणि फेंगशुईनुसार घोड्याची मूर्ती ठेवल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. धावणारे घोडे वेग, यश आणि सामर्थ्य यांचे प्रतीक आहेत. यामुळे जीवनात प्रगती होते. घोड्याची मूर्ती ठेवल्याने सुख-समृद्धी वाढते.
नोकरी-व्यवसायात काही अडचण असल्यास घोड्याची मूर्ती ठेवावी. असे म्हटले जाते की धावणाऱ्या घोड्याची मूर्ती नकारात्मक उर्जा नष्ट करून ती सकारात्मक ऊर्जा आणि विचार तयार करते. (Animals)
यामागे लॉजिक काय आहे?
पूर्वीच्या काळात राजे महाराजे यांच्याकडे खरेखुरे हत्ती, सिंह, वाघ, घोडे असे प्राणी होते. राज्याच्या रक्षणासाठी त्यांच्या वापर केला जायचा. त्यामुळे घरात सुबत्ताही नांदत होती. राज्य सुखी झालं, जनताही समाधानी होती. पण, सध्या असं जिवंत प्राणी पाळणे शक्य नाही. त्यामूळे त्या प्राण्यांचे प्रतिक असलेल्या त्यांच्या मुर्ती घरात ठेवल्याने घरात सुख समृद्धी नांदते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.