Vastu Tips : घरात कोणत्या दिशेला काय ठेवावं? ग्रहांच्या दिशेच गणित मनात फिट करून घ्या!

घर बांधण्याआधीच ग्रहांच गणित समजून घ्या
Vastu Tips
Vastu Tips esakal
Updated on

Vastu Tips : घर हे केवळ चार भिंतींची इमारत नसून ते प्रत्येकाच्या स्वप्नातलं घर असतं. दिवसभराच्या थकव्यानंतर आपण घरी जातो. तेव्हा प्रत्येकालाच प्रसन्न वातावरण हवं असतं. दिवसभराच्या कामाच्या धावपळीने थकल्या भागल्या जीवाला विसावा देणारी अशी वास्तू असते. घर बांधताना किंवा खरेदी करताना ते वास्तूशास्त्रानुसार आहे का?.

घराची सजावट करीत असताना वास्तूसाठी शुभ असणाऱ्या वस्तूंचा घरामध्ये आवर्जून समावेश करण्याबाबत आपण जागरूक असले पाहिजे कारण घरामधील वातावरण प्रसन्न असावे, घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार असावा.यासाठी वास्तूशास्त्रात सांगितलेले अनेक नियम कटाक्षाणे पाळले जातात.

Vastu Tips
Vastu Tips : तुम्ही जेवणानंतर ताटात हात धुतात? आताच थांबवा, नाहितर...

आपण ज्या घरात राहतो तिथं ठेवलेल्या वस्तूही योग्य जागेवर आहेत का?हे पाहणं तितकच महत्त्वाचं आहे. कारण, चुकीच्या दिशेला असलेल्या वस्तूंचा आपल्या नात्यांवर, आरोग्याव चुकीचा परिणाम होतो. त्यामुळे ग्रहांची दिशा आणि घरातील वस्तूंची दिशा यांचं गणित जाणून घेऊया.

पुर्व दिशा – सुर्य

आचार्य इंदू प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम तुम्हाला सूर्य ग्रहाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. पूर्व दिशा ही सूर्य ग्रहाची दिशा मानली जाते, म्हणजे सूर्यदेव हा पूर्व दिशेचा स्वामी आहे. त्यामुळे घराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असणे शुभ मानले गेले आहे. घराचे द्वार जर पूर्वोत्तर दिशेला असेल, तर अशा वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना उत्तम आरोग्य लाभते. घरामध्ये पूर्वेला बाथरूम असू नये. तसेच घराच्या पूर्वेला घरामधील उजेड अडेल अशी वस्तू नसावी.

पश्चिम दिशा - शनी

शनी पश्चिम दिशेचा स्वामी असून, वरूण या दिशेचे देवता आहेत. वास्तूमध्ये शनीचा प्रभाव शुभ नसेल, तर वास्तूदोष निर्माण होऊ शकतात. वारंवार असफलता मिळणे, घरामध्ये अशांती, इत्यादी समस्या यामुळे उद्भवू लागतात. हे वास्तूदोष दूर करण्यासाठी घरामध्ये धार्मिक ग्रंथांचे वाचन नेमाने केले जावे.

Vastu Tips
Vastu Tips : Bathroom मधला आरसा फुटला तर त्वरीत काढा..अन्यथा....

दक्षिण दिशा - मंगळ

 दक्षिण दिशेचा स्वामी मंगळ असून, या दिशेचा देवता यम आहे. ही दिशा जरी स्थिर मानली गेली असली, तरी जर मंगळ शुभफलदायी नसेल, तर दक्षिण दिशाभिमुख वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांच्या बाबतीत सतत काही ना काही आर्थिक अडचणी, तब्येतीच्या तक्रारी उद्भवत असतात.

उत्तर दिशा - कुबेर

उत्तर दिशेचा कारक बुध असून कुबेर या दिशेचे देवता आहेत. जर बुध शुभफलदायी असला, तर घरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण राहते. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ फुलांच्या वेली लावाव्यात.

Vastu Tips
Kitchen Vastu Tips : किचनमधील वास्तूदोषामुळे आयुष्य होईल उध्वस्त;  ही चित्रे लावा मग बघा धान्यांच्या राशीच पडतील घरात!

आग्नेय दिशा - शुक्र

शुक्रदेव ऐश्वर्याचा स्वामी असून, घरामध्ये सुख-शांती, संपन्नता प्रदान करणारा आहे. आग्नेय दिशेचा हा स्वामी असून, ज्यांच्या वास्तू आग्नेय दिशाभिमुख आहेत अशा वास्तूंमध्ये राहणाऱ्या महिलांचे आरोग्य उत्तम असते. या घरामध्ये धनधान्याची कमतरता होत नाही.

नैऋत्य दिशा - राहू

नैऋत्य म्हणजेच दक्षिण-पश्चिम दिशेचा स्वामी राहू असून, ही दिशा आयु आणि यश प्रभावित करणारी आहे.

ईशान्य दिशा - बृहस्पती

ईशान्य दिशेचा स्वामी बृहस्पती असून विष्णू या दिशेचे देवता आहेत. आध्यात्मिक उन्नती प्राप्त करून देणारी, ज्ञान प्रदान करणारी आणि मानसन्मानामध्ये वृद्धी करणारी अशी ही दिशा आहे.

वायव्य दिशा - चंद्र

वायव्य दिशेचा ग्रह चंद्र असून, वायू या दिशेचे देवता आहेत. जर चंद्राचा प्रभाव शुभ असेल तर घरामध्ये नेहमी सुख समृद्धी नांदते. जर चंद्र अशुभ फल देणारा असेल तर घरामध्ये नेहमी मानसिक तणाव पाहावयास मिळतो.

कोणत्या दिशेला काय असावं

उत्तर दिशा - या दिशेला जास्त वस्तू ठेवू नयेत. या दिशेला तिजोरी ठेवणे उत्तम मानले जाते.

दक्षिण दिशा - या दिशेला शौचालय नसावे.

पूर्व दिशा - घराचे मुख्य प्रवेशद्वार या दिशेला असणे खूप चांगले आहे.

पश्चिम दिशा - स्वयंपाकघर आणि शौचालय या दिशेला असावे.

ईशान्य - ही ईशान्य दिशा आहे. या दिशेला पुजागृह असणे अत्यंत शुभ मानले जाते.

आग्नेय कोन -ही आग्नेय दिशा आहे. या दिशेने गॅस, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी ठेवता येतात.

नैऋत्य कोन - घराच्या प्रमुखाची खोली नैऋत्य कोपऱ्यात असणे शुभ मानले जाते.

वायव्य कोन - शयनकक्ष, गॅरेज, गोठा, गेस्ट रूम इत्यादी या दिशेला करता येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.