Vastu Tips For Food: तुम्हीही जेवणानंतर ताटात हात धुता का?हे आत्ताच थांबवा कारण...

वर्षानुवर्षे आपण करत असलेली ही कृती चुकीचीच आहे
Vastu Tips For Food
Vastu Tips For Foodesakal
Updated on

Vastu Tips For Food : आपली रोजची सवय असते. जेवणं झालं की त्याच ताटात हात धुवायचं. खरं तर उच्चभ्रू लोकांमध्ये प्लेटमध्ये हात धुणं टाळलं जात. ते लोक जेवण झालं की उठून बेसिनमध्ये कींवा वेगळ्या भांड्यात हात धुतात. काही लोकांना हे वेगळं वाटत असलं. तरी सामान्य कुटुंबात आजही जेवणाच्याच ताटात हात स्वच्छ केले जातात.

वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असं करणं चुकीचं मानलं जातं. आचार्य इंदू प्रकाश यांनी याबद्दल काही सल्ले आपल्याला दिले आहेत. त्यांच्या मते, अन्न खाताना हे लक्षात ठेवले पाहिजे की जेवढे खावेसे वाटते तेवढेच घ्या. घरी, विशेषतः लहान मुलांना ही सवय असते की ते ताटात जास्त अन्न घेतात आणि फारच कमी खातात, त्यामुळे अन्न वाया जाते.

Vastu Tips For Food
Tulsi Vastu Tips : तुळशीचं रोप देईल घरात आरोग्य आणि सौख्य

शास्त्रात असं अन्न वाया घालवण्याला अजिबात योग्य मानले जात नाही. त्यामुळे घराच्या आर्थिक विकासात अडचण निर्माण होते. म्हणून, ही गोष्ट मुलांना आणि इतर सर्व लोकांना देखील समजावून सांगा की ताटात तेवढेच अन्न घ्या, जेवढे ते खाऊ शकतील. यामुळे घरातील सर्व काही सुरळीत चालू राहते.

शास्त्रानुसार ताटात खरकट ठेऊ नये. तसेच, रात्रीच्या वेळी खरकटी भांडीही घरात ठेवू नयेत.ती वेळच्यावेळी स्वच्छ करावीत. किचन ओटाही स्वच्छ करावा. काही लोक जेवण केल्यानंतर टेबलावर तसेच,  प्लेट ठेवतात. असं करू नका.

Vastu Tips For Food
Tulsi Vastu Tips : तुळशीचं रोप देईल घरात आरोग्य आणि सौख्य

जेवल्यानंतर भांडी ताबडतोब सिंकमध्ये किंवा घरात जिथे जिथे भांडी धुत असतील तिथे ठेवावीत. याशिवाय लक्षात ठेवा की अन्न खाल्ल्यानंतर त्याच ताटात खरकटा हात कधीही धुवू नये. असे करणे स्वतःच संकटांना आमंत्रण देणारी बाब आहे.

देशातील दक्षिणेकडील प्रांतांमध्ये काही संप्रदायात ताटात हात न धुणे अयोग्य समजले जाते. ताटात हात धुणे म्हणजे अन्नदेवतेचा सन्मान समजण्यात येते. दोन्ही प्रथा परस्परभिन्न असल्या तरी भावना मात्र अन्न देवतेच्या सन्मानाचीच आहे. त्यामुळे ताटात हात धुणे किंवा न धुणे या गोष्टीपेक्षाही अन्नाची नासाडी होणार नाही.

Vastu Tips For Food
Vastu Tips : Bathroom मधला आरसा फुटला तर त्वरीत काढा..अन्यथा....

जेवणादरम्यान या सर्व छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही तुमचे जीवन आनंदी करू शकता. जेवताना काही खास गोष्टी लक्षात ठेवण्याबाबत वास्तुशास्त्रातील ही चर्चा होती. या वास्तु टिप्सचा अवलंब करून तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे.

अन्नाच्या प्रत्येक कणाला द्या किंमत

भोजनाला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत अन्नाला देवता मानण्यात आले आहे. त्यामुळेच भोजनाचा सन्मान केला जातो. प्राचीन काळापासून आपल्याकडे ताटाखाली लाकडी पाट किंवा तिवई ठेवण्याची प्रथा आहे. ही प्रथा आजही ग्रामीण भागात सर्रास आढळते. यामागे अन्नदेवतेचा सन्मान करण्याची भावना असते. याशिवाय अनेक भागात जेवणानंतर ताटातील पाणी पिण्याचीही परंपरा आहे. यामागे अन्नाच्या प्रत्येक कणाला सन्मान देण्याचीच भावना आहे. 

Vastu Tips For Food
Vastu Tips For Kitchen : किचनमध्ये तुमच्याकडून नकळत झालेल्या या चूका घर उध्वस्त करू शकतात!

हे नियम पाळा

जेवताना मांडी घालून बसा

जेवणाचे ताट उंचावर ठेवा

कधीच सोफा किंवा बेडवर बसून जेऊ नका

जेवणा आधी श्लोक म्हणा

श्लोक नाही तर किमान जेवण झाल्यावर देवाचे आभार माना

ताटातील प्रत्येक पदार्थाचा घास काढून ठेवा मग जेवा

तुम्ही जेवायला बसल्यावर कोणी दारात भाकरी मागायला आलं तर त्याला उपाशी ठेऊ नका

Vastu Tips For Food
Vastu Tips For Kitchen : किचनमध्ये तुमच्याकडून नकळत झालेल्या या चूका घर उध्वस्त करू शकतात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.