Keep Candles In Child Study Room: तुमच्या लहान मुलांना कधीकधी अभ्यास करावासा वाटत नाही. तुम्ही त्यांना रोजरोज समजावून सांगुनही ही मुले अभ्यास करण्यापासून दूर पळतात. मग अशा वेळी वास्तूशास्रानुसार काही उपाय केल्यास मुलांचे लक्ष अभ्यासाकडे केंद्रित होऊ शकते.
लहान मुले ही प्रचंड चंचल असतात, त्यांचे मन सारखे इकडे तिकडे भटकत असते. मुलांमध्ये ही अशी चंचलवृत्ती असणे चांगली गोष्ट आहे, परंतु काहीवेळा या चंचलवृत्तीमुळेच मुले ही अभ्यासात मागे पडतात. सतत खेळायचे विचार डोक्यात असल्यामुळे मुलांचे अभ्यासात मन लागत नाही. मुले ही एकाग्र होऊन अभ्यासच करू शकत नाहीत, मुले अभ्यासाचं नाव ऐकताच अभ्यास न करण्यासाठी कारणे शोधू लागतात.अशा मुलांना अभ्यास सोडून बाकी सगळ्या गोष्टी आवडतात.
मुलांच्या या अशा अभ्यास न करण्याच्या सवयींमुळे त्यांचे पालक खूप चिंतेत असतात. कधी कधी अतिरेक झाला की आई मग मुलांवर चिडते किंवा त्याला दोन तिन चापटा मारते, पण हे असे करणे योग्य नसते, कारण लहान मुलांचे हृदय नाजूक असते आणि ते लहानसहान गोष्टी लवकर मनाला लावून घेतात.म्हणून अशा वेळी लेकरांला दोष देण्यापेक्षा वास्तुत असणाऱ्या दोषांवर जर आपण काम केले तर खूप चांगल होईल. वास्तूशास्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्यामुळे मुलांचे लक्ष अभ्यासाकडे केंद्रित होते. चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल सविस्तर माहिती.
● रोज नियमितपणे मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत एक मेणबत्ती लावा. वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत मेणबत्त्या लावल्यामुळे त्यांचे मन अभ्यासाकडे केंद्रित होते. वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या खोलीच्या पूर्व, उत्तर-पूर्व किंवा दक्षिण भागात मेणबत्ती लावल्याने मुले अभ्यासाकडे आकर्षित होतात. आणि आपोआप मुलांचा अभ्यासात रस वाढू लागतो. त्याचबरोबर त्यांची बौद्धिक क्षमताही वाढते.
● मुलांचा अभ्यासाचा टेबल 'या' दिशेला ठेवावा. तुमचा मुलगा ज्या टेबलवर अभ्यास करतो. तो टेबल आयताकृती आकाराचा असावा. बाजारात भेटणारे विचित्र आकारांचे टेबल काही लोकांना आकर्षक वाटू शकतात, परंतु मुलांच्या अभ्यासासाठी ते टेबल अत्यंत हानिकारक ठरू शकतात. मुलांचा अभ्यासाचा टेबल हा नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून ठेवावा.
● मुलांच्या नाभीवर कुंकू लावावे.ज्योतिष शास्त्रानुसार, जर मुलांना अभ्यासात अजिबात मन लागत नसेल तर तुम्ही त्यांच्या खिशात तुरटीचा तुकडा ठेवा आणि दररोज तुमच्या मुलाच्या कपाळावर आणि नाभीला कुंकू तिलक लावावा.
● गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके आणि पेन दान करावे. ज्योतिष शास्त्रानुसार तुमच्या मुलांची अभ्यासात रुची वाढवण्यासाठी प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णूच्या मंदिरात आपल्या क्षमतेनुसार वह्या आणि पेन दान करा. असे करणे शुभ मानले जाते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.