Vastu Tips: तुमच्या घरात 'या' 4 गोष्टी निट ठेवा; तुम्ही आपोआप व्हाल मालामाल..
आपल्या जीवनातील अनेक अविभाज्य गोष्टी योग्य दिशेला ठेवल्यास कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, असे वास्तुशास्त्रात म्हटल्याचे सांगितले जाते. याशिवाय त्या गोष्टी योग्य पद्धतीने पाळल्या तर आपोआप घरात सुख, समृद्धी टिकून राहते, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य बाब असलेला पैसा योग्य ठिकाणी, योग्य दिशेला ठेवल्यास तुम्हाला अधिक धनवृद्धी होऊ शकते.
मात्र, त्यांची दिशा चुकल्यास नुकसान, समस्यांचा सामना करावा लागू शकतो, असे सांगितले जाते. वास्तुशास्त्र वा वास्तु विज्ञानाप्रमाणे धनाची योग्य दिशा कोणती? त्याचे नेमके काय फायदे मिळू शकतील? अशा भरपूर प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न आम्ही या लेखातून करणार आहोत...
चला तर मग जाणून घेऊ या घरातील काही गोष्टी कोणत्या दिशेला ठेवायच्या असतात.
घरातील पैसाची तिजोरी कोणत्या दिशाला ठेवावी ?
बहुतांश कुटुंबात तिजोरी असतेच. घरात पैसे ठेवण्याची एक जागा निश्चित करण्यात आलेली असते. तिजोरी, कपाट वा अन्य उपलब्ध साधनांनुसार पैसे, महत्त्वाची कागदपत्रे, दागिने आणि अन्य बाबी जपून ठेवण्यात आलेल्या असतात. वास्तुशास्त्रानुसार, उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली गेली आहे. आपली धन, पैसा ठेवण्याची तिजोरी वा कपाट हे उत्तर दिशेला तोंड करून ठेवावे, असे सांगितले जाते. उत्तर दिशेला कपाट वा तिजोरी उघडली जावी. यामुळे धन, दागिने, कोषवृद्धीचे योग प्रबळतेने जुळून येतात. नोकरी तसेच व्यापारातील समस्या हळूहळू दूर होऊ लागतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
घराच्या सांडपाण्याची दिशा कोणती असावी ?
घर बांधताना सांडपाण्याचा निचरा कोणत्या दिशेला होतोय, याबाबत दक्षता बाळण्यासंदर्भात वास्तुशास्त्रात भाष्य करण्यात आले आहे. घरातील सांडपाणी किंवा दुषित पाणी बाहेर पडण्याची दिशा ही उत्तर असावी, असे वास्तुशास्त्र सांगते. पाण्याचा निचरा होण्यासाठी उत्तर दिशा शुभ मानली गेली आहे. यामुळे घरात सुख, आनंद नांदून मान, सन्मान, प्रतिष्ठा वृद्धिंगत होते, असे सांगितले जाते. एवढेच नव्हे, तर प्रलंबित वा जुनी येणी वसूल होण्यातील समस्या दूर होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
देवघराची दिशा कोणती ठेवावी ?
आपल्याकडे प्रत्येक घरात देवघर असते. प्रत्येक व्यक्ती हा आपल्या श्रद्धेप्रमाणे देवाची आराधना करत असतो. वास्तुशास्त्रात देवघराची जागा किंवा एखाद्या देवतेला कोणत्या दिशेला स्थापन करावे, याबाबत सविस्तर भाष्य करण्यात आल्याचे दिसून येते.महादेव शिवशंकराचे पूजन करावयाचे असल्यास शिवाची मूर्ती वा शिवलिंग किंवा तसबीर अशा पद्धतीने ठेवावी, जेणेकरून पूजा करताना आपले मुख हे उत्तर दिशेला असेल. उत्तर दिशेला तोंड करून केलेल्या पूजन लाभदायक मानले गेले आहे. असे केल्याने शांतता, समाधान, सुख, आनंदाची प्राप्ती होते. तसेच पूजेच्या श्रेष्ठ फलाची आणि पुण्याची प्राप्ती होते. एवढेच नव्हे, तर धन, धान्य, प्रसन्नता आणि उत्तम आरोग्य लाभू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
कचरापेटी नेमकी कुठे ठेवावी ?
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर दिशेला कधीही कचरा, घाण जमा होऊ देऊ नये. घराची उत्तर दिशा ही धन आणि करिअरची असल्याचे शास्त्रात मानले गेले आहे.
घराच्या मागच्या बाजूला कचरापेटी ठेवावी.असे केल्यास आर्थिक आघाडीवरील समस्या वाढू शकतात. धनासंदर्भातील समस्यांचा सामना करावा लागू शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वास्तुशास्त्रातील नमूद केलेल्या गोष्टींना अनुसरून कार्य केल्यास धन, धान्य, सुख, समृद्धी, आनंद, वैभव प्राप्ती होऊ शकते, असे म्हटले जाते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.