Vastu Shastra for Money: शास्त्रानुसार देवी-देवतांच्या पुजेसाठी दिवा लावून त्यांना ओवाळणं हा एक महत्वाचा भाग आहे. आपण अनेक जण संध्याकाळी मनोभावे देव्हाऱ्यात देवांपुढे दिवाबत्ती करतो आणि मनोभावे पुजा करतो. यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं. तसचं घर आनंदी आणि प्रसन्न राहतं.
पण तुम्हाला माहित आहे का वास्तूशास्त्रानुसार Vastu Shastraतसचं ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही ठराविक वेळी, ठराविक ठिकाणी आणि विशिष्ट देवतेसमोर दिवा Diya लावल्यास तुमच्या अनेक अडचणींचं समाधान होवू शकतं. Vastu tips Marathi for prosperity light diya at proper place to get money
पैसा ही एक अशी गोष्ट आहे जी कमवण्यासाठी प्रत्येकजण रक्ताचं पाणी करत असतो. मात्र प्रचंड परिश्रम करूनही बऱ्याचदा पुरेसा पैसा Money हाती येत नाही. तर बऱ्याचदा हाती आलेला पैसा घरात टिकत नाही.
कधी व्यवसायात Business नुकसान तर कधी दिलेले पैसे परत मिळत नाहीत. घरात पैसा टिकावा तसचं लक्ष्मीचा आशीर्वाद कायम रहावा यासाठीच आम्ही तुम्हाला काही वास्तू टीप्स सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला धनलाभ होण्यास मदत होईल. Vastu tips Foe wealth
उंबरठ्यात लावा दिवा- आपण संध्याकाळी घरात देवापुढे दिवा लावतो. पण त्यासोबतच घरातील दाराबाहेर दिवा लावणं हे शुभ मानलं जातं. यामुळे घरात समृद्धी Prosperity वाढते. दक्षिणेला मुख्यद्वार असलेल्या घरांसाठीदेखील ते फायदेशीर ठरतं. घरापुढे Home दरवाजात दिवा लावल्याने घरात नकारात्मकता Negativity प्रवेश करत नाही.
तसंच सकारात्मकता आणि समृद्धीसाठी वाट मोकळी होते. हा दिवा लक्ष्मीमातेला Laxmi Godess आपल्या घराची वाट दाखवतो यामुळे घरात लक्ष्मी प्रवेश करते आणि तिचा आशीर्वाद घरावर राहतो. यामुळे पैशांची तंगी दूर होते. तसंच यशाचा मार्ग मोकळा होतो आणि जीवनात पुढे जाण्यास मदत होते.
लक्ष्मीमातेसमोर सातमुखी दिवा- पैशासंबधी अडचणींवर मात करण्यासाठी लक्ष्मीमातेच्या प्रतिमेसमोर सातमुखी म्हणजेच सात वाती असलेला दिवा प्रज्वलित केल्याने सर्व अडचणी दूर होतील. तसचं तुमचे एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे किंवा थांबलेला व्यवहार सुरळित होण्यास मदत होईल.
धन-धान्य वृद्धीसाठी दिवा- ज्योतिषशास्त्रानुसार दर बुधवारी श्रीगणेशासमोर तीनमुखी दिवा लावणं लाभदायक ठरू शकतं. यासाठी दर बुधवारी तीन वाती असलेला शुद्ध तुपाचा दिवा गणपती समोर लावावा. या गणरायाला दुर्वा अर्पण कराव्या. यामुळे घरात कधीही धन-धान्याची कमतरता निर्माण होत नाही.
हे देखिल वाचा-
दिवा लावण्याची योग्य वेळ पद्धत:
संध्याकाळी दिवा हा योग्यवेळी लावणं गरजेचं आहे. तिन्हीसांजेला दिवा लावला गेला पाहिजे. म्हणजेच सूर्य पुर्णपणे मावळण्याच्या आता उजेड असतानात अंधार होण्याआधी दिवे लावणं योग्य. जेव्हा दिवस आणि रात्र या दोन वेळा एकत्र येत असता तेव्हा इश्वराची येण्याची वेळ होत असते. जसं सकाली ब्रह्माबेला ही योग्य वेळ मानली जाते. Right time to light diya
तसंच देव्हाऱ्यात दिवा ठेवताना तो योग्य ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. दिवा हा कुठेही न ठेवू नये. याशिवाय जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर तो नेहमी तुमच्या उजव्या बाजूला ठेवावा आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो ड्याव्या बाजूला ठेवावा.
देवासमोर किंवा दारात दिवा लावताना दिव्याची वात ही पूर्व दिशेला असावी. तसंच धनप्राप्तीसाठी दिव्याची वात उत्तर दिशेला असवी. दक्षिण दिशेस दिव्याची वात कधीच असू नये याची काळजी घ्यावी.
दक्षिण ही यमाची दिशा असल्याने या दिशेला दिव्याची वात असू नये. केवळ दिवाळीच्या काळात यमदिपदान करते वेळी दक्षिण दिशासा वात असलेला दिवा लावला जातो. यमाकडे दिर्घायुष्य मागण्यासाठी हा दिवा लावला जातो.
याशिवाय वर्षातून एकदा येणाऱ्या सणांमध्ये दिवाळीचा सण असा असतो जेव्हा आपण घरात रोषणाई करून आनंद साजरा करतो. यावेळी धनतेरस हा दिवस महत्वाचा मानला जातो. धनतेरसच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात दिवा प्रज्वलित करावा.
दिव्यासाठी गायीचं तूप वापरावं तसचं नेहमीची कापसाची वात न वापरता वातीसाठी लाल धाग्याचा वापर करावा. हा दिवा थेट जमिनीवर न ठेवता थोडीशी तांदळाची आरास करून त्यावर हा दिवा ठेवावा. यामुळे घरात आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं.
तसंच देव्हाऱ्यात किंवा दारात दिवा लावताना दिवे लावण्याची जागा स्वच्छ असेल हे पहावं. उंबरठ्यात दिवा लावण्यापूर्वी कधीही स्वच्छ पाणी शिंपडून उंबरठा पुसून घ्यावा. त्यानंतर छोटीशी रांगोळी काढून त्यावरच दिवा ठेवावा. दिवा स्वच्छ असेल हे पहावं. कारण देवांनाही स्वच्छ ठिकाणी राहणं आवडतं त्यामुळे. देवघर आणि देवघरातील इतर वस्तूही वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.