Best Vastu Tips : प्रशांत आणि श्रेया एक नवं लग्न झालेलं जोडपं. लग्नानंतर काही दिवस ते गावी राहीले. कामानिमित्त प्रशांतला शहरात जावं लागलं. त्यानं तिथ एक घर पाहीलं. जे दोघांनाही परवडणारं आणि आरामात राहता येईल असं होतं.
घर अशा ठिकाणी होतं की जे प्रशांतच्या ऑफिसजवळ होतं. त्यामुळे त्याचा ऑफिसला येण्या-जाण्याचा खर्च वाचणार होता. सगळं चांगलं सुरू होतं. श्रेया नव्या घरी आली, दोघांचा संसार सुरू झाला पण नव्या घरात शांतता नव्हती. कारण त्यांची बेडरूम आणि त्याला लागून असलेलं देवघर हे दक्षिण दिशेला होतं. त्या घरात अनेक वास्तू दोष होते. त्यामुळे या दोघांच्या संसाराला जणू दृष्टच लागली.
तुम्ही घर परवडतंय, ऑफिसजवळ आहे म्हणून घेणार असाल तर आधी विचार करा. घर केवळ परवडतं म्हणून घेऊन चालणार नाही. त्यासाठी घर वास्तूशास्त्रानुसार बांधायला हवं. घरात दक्षिण दिशेला असलेली बेडरूम आणि देवघर तुमचं घर उद्धस्त करू शकतात. त्यामुळेच घर वास्तूशास्त्रात आहे की नाही हे एकदा तपासून पहा.
घराच्या दक्षिण दिशेला या 5 वस्तू ठेवू नका
घरातील मशीन्स
घरात जिथे जागा होते तिथे आपण सामान रचत असतो. ते त्या जागेसाठी योग्य आहे की नाही हे आपल्याला माहितीही नसतं. आता इलेक्ट्रिक वस्तूंचच घ्या. घरात असलेला फ्रिज आपण कुठे ठेवतोय हे पाहिलं पाहिजे.
घरात तुम्ही कुठेही इलेक्ट्रिक वस्तू ठेवल्यात तरी घराच्या दक्षिण दिशेला कधीही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि मशीन ठेवू नयेत. त्यामुळे कुटुंबातील नातेसंबंधात दुरावा निर्माण होऊ लागतो.
देवघर
घरात कोणतीही अडचण आली की आपण आधी देवाचा धावा करतो. पण चुकीच्या जागी असलेल्या देवघरात देवत्व नसतं. त्यामुळं मंदिर नेहमी उत्तर-पूर्व दिशेला ठेवावे. घराचे मंदिर चुकूनही दक्षिण दिशेला ठेवू नका. यामुळे तुम्हाला पूजेचे फळ मिळणार नाही आणि तुमच्या मनोकामनाही पूर्ण होणार नाहीत. (Vastu Tips)
बेडरूम
अनेकवेळा घरी सगळं चांगल असतं. पण, नवरा बायकोचे अनेकदा खटके उडत असतात. अशावेळी एकदा बेडरून बदलून पहा, असं सांगितलं जातं. कारण दोष जोडप्यांमध्ये नाहीतर बेडरूममध्ये असू शकतो.
बेडरूममध्ये वैवाहिक जीवन परिपूर्ण आणि आनंदी बनवायचे असेल तर बेडरूम दक्षिण दिशेला नसावी. इतकेच नाही तर वास्तूनुसार बेडरूममधील पलंगही दक्षिण दिशेला नसावा. यामुळे पती-पत्नीचे नाते बिघडते आणि निद्रानाश होऊ शकतो.
चप्पल स्टँड
शक्यतो प्रत्येकाचेच चप्पल स्टँड घराच्या बाहेर असते. त्यामुळ त्याकडे फारसे कोणी लक्ष्य देत नाहीत. पण, तुम्हाला माहितीय का चपलांची जागा चुकली तरी तुमच्यावर संकटे येऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार शूज, चप्पल किंवा शू रॅक घराच्या दक्षिण दिशेला ठेवू नयेत. यामुळे पितरांचा अपमान होतो. तसेच घरात छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होतात आणि घरातील सुख-शांती भंग पावू शकते.
तुळस
भारतात प्रत्येकाच्या घरी तुळस असते. तुळशीची अनेक उत्साहात पूजाही केली जाते. घरात प्रवेश करताना तुळशीला वंदन करून, तिच्यातून येणारी शुद्ध हवा मिळवूनच लोक घरात येतात. तुळस शुभ आहे पण जर ती दक्षिणेकडे आली असेल तर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर ते दक्षिण दिशेला ठेवू नये. ही पूर्वजांची दिशा असून येथे तुळशीचे रोप लावल्यास लाभ होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. (Basil Plant)
दक्षिण दिशेसाठी काही उपाय
वास्तूनुसार दक्षिण दिशेचा घटक अग्नी आहे आणि अग्नीचा सूचक लाल रंग आहे. त्यामुळे दक्षिण दिशा लाल रंगाशी संबंधित आहे.अग्नी आणि लाल रंग हे दोन्ही रंग उन्हाळ्यात सर्वाधिक समृद्ध असतात. दक्षिण दिशेला लाल रंग रंगवल्यास किंवा लाल रंगाच्या वस्तू ठेवल्यास या दिशेशी संबंधित चांगले परिणाम मिळतात.
कारण ही दिशा घरातील मधल्या मुलीशीही संबंधित आहे. त्यामुळे दक्षिण दिशेला लाल रंग देणे आणि अग्नीशी संबंधित वस्तू ठेवल्याने घरातील मधल्या मुलीला खूप फायदा होईल. आचार्य इंदू प्रकाश यांच्यानुसार ही दिशा डोळ्यांशी संबंधित आहे. त्यामुळे जर तुम्हाला डोळ्यांशी संबंधित काही समस्या वारंवार येत असतील तर दक्षिण दिशेची वास्तू अवश्य दाखवून घ्या आणि त्यानुसार सुधारणा करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.