Vastu Tips : अन्न वाढताना 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा; अन्नपूर्णा होईल प्रसन्न

वास्तुशास्त्रातही जेवण देण्यापासून ते जेवणापर्यंतचे नियम सांगितले आहेत.
Vastu Tips
Vastu Tips
Updated on
Summary

वास्तुशास्त्रातही जेवण देण्यापासून ते जेवणापर्यंतचे नियम सांगितले आहेत.

Vastu Tips : जेवताना बोलू नये. एकाजागी बसून जेवावे किंवा जेवताना वारंवार उठू नये. माणसाने नेहमी पाणी पिताना किंवा जेवताना एकाजागी बसावे आणि पाणी प्यावे किंवा जेवावे. मात्र, सध्या या सुरु असलेल्या धावपळीच्या जीवनात आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. ज्यामुळे आपण भारावतो. दरम्यान, वास्तुशास्त्रातही जेवण देण्यापासून ते जेवणापर्यंतचे नियम सांगितले आहेत. जेवण देताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, अन्यथा घरात गरिबी, आर्थिक संकट येऊ शकते. याचसंदर्भातील काही महत्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत...

भाकरी वाढतानाचे नियम

वास्तुशास्त्रानुसार, रोटी किंवा भाकरी वाढताना नेहमी ताटातून आणावी. याशिवाय स्वच्छ हाताने ती भाकरी वाढावी. भाकरी संपली की, ताटातून दुसरी भाकरी आणावी. यामुळे अन्नपूर्णा प्रसन्न होते आणि घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही. त्याचबरोबर हातातून भाकरी आणणे किंवा वाढणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे कुटुंबात कलहाची परिस्थिती निर्माण होते आणि घरात गरिबी येते.

Vastu Tips
Vastu Tips : रात्री झोपण्यापूर्वी 'हे' उपाय करा; पैशांचा पाऊस पडेल अन् सुखी व्हाल

शिळे पीठ वापरू नये

सकाळचे उरलेले पीठ किंवा रात्री उरलेले पीठ नंतर वापरल्याचे अनेकदा दिसून येते. फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर त्याच पिठापासून भाकरी तयार करणे ही पद्धत योग्य मानली जात नाही. शास्त्रात सांगितले आहे की, शिळ्या पिठाची रोटी बनवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.

तीन रोट्या ठेवू नये

शास्त्रानुसार जेवण देताना ताटात तीन चपाती किंवा पोळी एकत्र ठेवू नयेत. असे करणे अशुभ मानले जाते. तीन भाकरी, रोटी एकत्र खाल्ल्याने ग्रहांवर वाईट परिणाम होतो, त्यामुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धी जाते.

Vastu Tips
जीन्स पॅन्टला छोटा खिसा का असतो ? ‘या’ लोकांसाठी बनवण्यात आलाय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.