Vastu Tips : लक्ष्मी मातेने घरात वास करावा असं वाटत असेल तर या गोष्टी आत्ताच बाहेर काढा!

वास्तू शास्त्राचे हे नियम सुद्धा पाळा, अनेक लाभ होतील
Vastu Tips
Vastu Tips esakal
Updated on

Vastu Tips : घरात प्रवेश करताना रितसर वास्तूशांत केली जाते. सुवासिनी, ब्राह्मण भोग केले जातात. वास्तू उभी राहताना त्यात काही दोष नसतात. पण, जेव्हा लोक त्या वास्तूत रहायला जातात तेव्हा त्यांना त्रास सुरू होतो.  

बऱ्याचदा काही घरांमध्ये तुम्हाला सतत भांडणं असल्याचं जाणवतं. काही घरांमध्ये सुखशांती आणि समाधानाचा अंशही नसतो. अशावेळी आपल्याला काही वास्तूदोष असल्याचंही सांगण्यात येतं.(Vastu Tips)

तुम्हाला जर घरामध्ये सुखशांती राखायची असेल तर तुमच्या स्वभावासह तुमच्या घरात देखील काही वास्तूबदल करावे लागतात. त्यासाठी नक्की काय उपाय करायचे असतात याबाबतीत बऱ्याच टिप्स असतात.

घरात आणि आपल्या ऑफिसमध्ये अथवा आपल्या आजूबाजूला सुख आणि समृद्धी हवी असेल तर त्यासाठी वास्तूचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. (Vastu Tips : Throw these things out of the house without delay, otherwise you will have to face many problems including financial crunch)

Vastu Tips
Bathroom Vastu Tips: घरात शांतता हवीय?, केवळ घरच नाहीतर बाथरूमही शास्त्राप्रमाणेच असावं लागतं!

नकळत आपण अनेकदा आपल्या घरात अशा अनेक गोष्टी जमा करत राहतो, ज्याचा नंतरही काही उपयोग होत नाही. आपण त्यांना घराच्या कोपऱ्यात ठेवतो आणि विसरतो. पण तुमची ही छोटीशी चूक तुमच्या कुटुंबासाठी अडचणी निर्माण करू शकते.

जर तुम्हाला तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असावा आणि कुटुंबात समृद्धी हवी असेल तर आजच या गोष्टी घराबाहेर टाका. आज वास्तुशास्त्रामध्ये आपण आचार्य इंदू प्रकाश यांच्याकडून त्या 10 गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी येत आहे.  

या गोष्टी घरातून काढून टाका

वास्तू शास्त्रानुसार घरात असलेल्या जुन्या तुटलेल्या वस्तू घरातील नकारात्मकता वाढवतात. यातही खासकरून घरातील इलेक्ट्रॉनिक सामान अधिक नकारात्मकता वाढवतं. म्हणूनच जर तुमच्या घरातही तुटलेलं फर्निचर, घड्याळं किंवा इलेक्ट्रीक वस्तू असतील तर आजच त्या घराबाहेर काढा. 

Vastu Tips
Bathroom Vastu Tips: घरात शांतता हवीय?, केवळ घरच नाहीतर बाथरूमही शास्त्राप्रमाणेच असावं लागतं!

वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेली तुटलेली काच किंवा आरसा, तुटलेली पलंग, निरुपयोगी भांडी, बंद पडलेले घड्याळ, दूषित झालेली देवाची मूर्ती, तुटलेले फर्निचर, खराब झालेले चित्र आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, तुटलेले दार आणि शेवटचे पडलेले बंद पेन.

या सर्व गोष्टींमुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो. सदस्यांना आर्थिक नुकसान तसेच कुटुंबातील सदस्यांचे मानसिक गोंधळ होतो. पती-पत्नीच्या वैवाहिक जीवनावरही त्यांचा नकारात्मक प्रभाव पडतो. या सर्व गोष्टी लवकरात लवकर घरातून बाहेर काढल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरी येईल आणि घरात सुख-शांती नांदेल.  

Vastu Tips
Bathroom Vastu Tips: घरात शांतता हवीय?, केवळ घरच नाहीतर बाथरूमही शास्त्राप्रमाणेच असावं लागतं!

वास्तू शास्त्राचे हे नियम सुद्धा पाळा

  • वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपाला पाण्याबरोबर दूध अर्पण करावे. असे म्हटले जाते की असे केल्याने घरातील त्रास दूर होतो.

  • वास्तुशास्त्रानुसार घरात वाळलेली फुले ठेवू नका. असे मानले जाते की यामुळे जीवनात दुःख येते. घराच्या सर्व दारावर समान रेषा काढा. घरातून नकारात्मकता दूर होते.

  • वास्तुशास्त्रानुसार, साधू आणि संतांचे चित्र दिवाणखान्यात किंवा ड्रॉईंग रूममध्ये ठेवा. असे केल्याने त्यांचे आशीर्वाद घरातील सदस्यांवर राहतात.

  • घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका.

  • वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यात हिरवी झाडे लावा. घरात गोलाकार कडा असलेले फर्निचर ठेवू नका. असे मानले जाते की असे केल्याने नात्यात दुरावा येतो.

  • वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा कापराचा धूर करणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. यासोबतच घरात मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंगा लावणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की, असे केल्याने घरातील सदस्य निरोगी राहतात आणि घरातून रोग दूर होतात.

  • वास्तुशास्त्रानुसार घरातल्या आतील झाडं किंवा रोपं आपल्या घरात शांतता आणि शुद्ध हवा पसरवतात. चांगलं आरोग्य आणि चिंता मुक्त जीवनासाठी तुळशीचं रोप लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.