Vastu Tips : वास्तूनुसार एखाद्याच्या घरात पृथ्वी, आकाश, हवा, अग्नी आणि पाणी या घटकांचे योग्य संतुलन असले पाहिजे. चांगले आरोग्य आणि समृद्धीसाठी स्वच्छ, प्रशस्त आणि गोंधळमुक्त घर आवश्यक आहे. घरातील व्यक्तींच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि इतर फायद्यांसाठी घरातील वातावरण खूप महत्वाचे असते.
वास्तूनुसार घर बनवताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून कुटुंबातील लोकांच्या जीवनात आनंद कायम राहील. असं म्हणतात की, घर किंवा ऑफिसच्या वास्तूमध्ये दोष असेल तर व्यक्तीची प्रगतीमध्ये बाधा निर्माण होते, आणि घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो.
कोणत्याही इमारतीच्या बांधकामात वास्तूची विशेष काळजी घेतली पाहिजे. एवढेच नाही तर घरात कोणत्या दिशेला वस्तू ठेवाव्यात हे देखील जाणून घेतले पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्ट ठेवण्यासाठी योग्य सांगण्यात आली आहे.
घरातील वास्तू तपासण्यासाठी तज्ञ तुम्हाला नक्कीच मदत करतील. पण काही वेळा त्यांची सेवा घेणे खिशाला जड होऊ शकते. म्हणून, प्रथम आपल्या घराची वास्तू स्वतः तपासण्याचा प्रयत्न करा. घर हसतं-खेळतं रहावं यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. पण, तरीही काही ना काही अडचणी येत असतात. त्यामुळेच घर कसे असावे याचा आज मागोवा घेऊयात.
उत्तर आणि पूर्व दिशा
घराची वास्तू तपासण्याचा विचार केला तर सर्वप्रथम घराच्या उत्तर आणि पूर्व दिशा मोकळ्या आहेत हे पाहावे. कारण घर हवेशीर आणि मोकळे असणे आवश्यक आहे. तसेच या दिशेनेही चांगला प्रकाश यायला हवा. ज्या घरांमध्ये उत्तर आणि पूर्व दिशा अशी असते, त्या घराची वास्तूमध्ये सकारात्मक उर्जा असते.
स्वयंपाकघर
स्वयंपाकघर हा घराचा अत्यावश्यक भाग आहे. म्हणूनच त्याची दिशा तपासली पाहिजे. स्वयंपाकघर नेहमी दक्षिण पूर्व म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात बनवण्याचा प्रयत्न करा. या दिशेला बनवलेले अन्न चवदार तर असतेच पण ते खाणेही फायदेशीर असते. एवढेच नाही तर आग्नेय कोनात बांधलेल्या स्वयंपाकघराचा गृहिणींच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो.
ब्रह्म स्थान
घराच्या सगळ्या कोपऱ्यांचा मध्यबिंदू असलेल्या जागेला ब्रह्म स्थान म्हणतात. ती जागा मोकळी ठेवावी. या ठिकाणी कोणतेही जड फर्निचर जसे की डायनिंग टेबल, सोफा किंवा इतर कोणतीही जड वस्तू ठेवू नका.
बेडरूमची दिशा
घराच्या बेडरूमची दिशाही खूप महत्त्वाची मानली जाते. घरातील प्रमुखाची बेडरूम दक्षिण-पश्चिम दिशेला असणे उत्तम मानले जाते. याउलट मोठ्या मुलाची बेडरूम दक्षिण दिशेच्या मध्यभागी असावी म्हणजे त्याला करिअरमध्ये प्रगती आणि यश मिळते. धाकट्या मुलाची बेडरूम पश्चिम दिशेच्या मध्यभागी बनवावी. जेणेकरून त्याला व्यवसायात यश मिळेल.
मुलांसाठी रूम
पश्चिम दिशा अभ्यासासाठीही चांगली मानली जाते. त्याचबरोबर मुलांसाठी शयनकक्ष उत्तर-पश्चिम दिशेला बनवणे चांगले मानले जाते. त्यामुळे त्यांना अभ्यासात मदत होते. मात्र, खोलीतील मुलांचे अभ्यासाचे टेबल पूर्व दिशेला असावे.
देवघर
उत्तर-पूर्व दिशेला पूजेचे घर असणे खूप शुभ मानले जाते. या दिशेचा स्वामी गुरु ग्रह आहे. या दिशेला विहिरी, बोअरिंग किंवा पिण्याचे पाणी यासारख्या पाण्याशी संबंधित गोष्टी करता येतात.
इलेक्ट्रॉनिक वस्तू
आग्नेय दिशा आहे. या दिशेने तुम्ही गॅस, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी ठेवू शकता.
नैऋत्य कोन
ही नैऋत्य दिशा आहे. या दिशेचे स्वामी राहू आणि केतू आहेत. या दिशेला खिडक्या किंवा दरवाजे नसावेत. घराच्या प्रमुखाची खोली आग्नेय कोपर्यात असणे शुभ मानले जाते.
स्टोअर रूम
ही घराची उत्तर-पश्चिम दिशा आहे. या दिशेने शयनकक्ष, गॅरेज, गोठा, स्टोअर रूम, पाहुण्यांच्या खोल्या इत्यादी बांधता येतील. या दिशेचा अधिपती ग्रह चंद्र आहे. या दिशेला खिडकी आणि प्रकाश असणे देखील चांगले मानले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.