Vat Purnima 2024 : यंदाच्या वटपौर्णिमेला करा मराठमोळा साज, 'या' प्रकारच्या साड्या नेसून करा पूजा, दिसाल एकदम झकास.!

Vat Purnima 2024 : अवघ्या काही दिवसांवर वटपौर्णिमेचा सण येऊन ठेपला आहे.
Vat Purnima 2024
Vat Purnima 2024esakal
Updated on

Vat Purnima 2024 : वटपौर्णिमा हा सण हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचा मानला जातो. ज्येष्ठ पक्षातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अवघ्या काही दिवसांवर वटपौर्णिमेचा सण येऊन ठेपला आहे. यंदा २१ जून (शुक्रवार) ही वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.

वटपौर्णिमेच्या दिवशी सूवासिनी वटपौर्णिमेचे व्रत करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. ही पूजा संपन्न झाल्यानंतर सूवासिनी उपवास सोडतात.

या सणाच्या दिवशी महिला साजश्रृंगार करतात आणि वडाची पूजा करतात. यंदाच्या वटपौर्णिमेला कोणत्या प्रकारच्या साड्या नेसायच्या? त्याबद्दल काही टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी अभिनेत्रींच्या काही लूक्सपासून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता.

Vat Purnima 2024
Vat Purnima 2024 : आज वटपौर्णिमेचा सण..! जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व अन् पुजेची पद्धत

नऊवारी साडी

वटपौर्णिमेला नेहमीसारख्या काठपदर साड्या नेसण्यापेक्षा तुम्ही नऊवारी साडी नक्कीच नेसू शकता. अभिनेत्री अंकिता लोखंडेने ही पिवळ्या रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली आहे. या प्रकारच्या नऊवाऱ्या साड्या तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळू शकतील.

नऊवारी साडीमध्ये देखील असंख्य प्रकार उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नऊवारी खरेदी करू शकता. तसेच, शिवून देखील घेऊ शकता. नऊवारी साडीवर मराठमोळे दागिने, हातात बांगड्या अवश्य घाला. तसेच, साजेसा मेकअप आणि केसांचा अंबाडा अशी हेअरस्टाईल नक्की करा.

बनारसी सिल्क

आजकाल बनारसी सिल्क साड्या ट्रेंडमध्ये आहेत. कोणत्याही लग्न समारंभाला, पूजेला, कार्यक्रमाला किंवा अगदी वटपौर्णिमेला देखील तुम्ही या प्रकारची साडी नेसू शकता. बनारसी सिल्क साडीमध्ये लाल, हिरवा, पिवळा, केशरी आणि गुलाबी हे रंग अधिक उठून दिसतात. या साडीमध्ये तुम्हाला पेस्टल रंगाच्या शेड्स देखील मार्केटमध्ये सहज मिळतील.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ही लाल रंगाची सुंदर बनारसी सिल्क साडी नेसली आहे. तुम्ही देखील या प्रकारची साडी नेसू शकता. त्यावर मिनिमल मेकअप, मोकळे केस आणि गळ्चात चोकर असा सोनालीसारखा लूक तुम्ही नक्कीच करू शकता.

केशरी सिल्क साडी

केशरी रंगासोबत इतर रंगांचे कॉंम्बिनेशन असलेली सिल्क साडी तुम्ही यंदाच्या वटपौर्णिमेला नेसू शकता.या साड्यांमध्ये विविध रंगांचे पर्याय तुम्हाला मार्केटमध्ये मिळू शकतील. अभिनेत्री जुई गडकरीने ही सुंदर केशरी-गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.

या साडीवर मराठमोळे दागिने किंवा तिच्याप्रमाणे पांढऱ्या खड्यांचे दागिने तुम्ही घालू शकता. जुईने या फोटोत मिनिमल मेकअप आणि केसांची सुंदर हेअरस्टाईल केली आहे. तुम्ही तिच्या या लूकपासून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता.

Vat Purnima 2024
Vat Purnima : वट पौर्णिमेला पुजल्या जाणाऱ्या वडाचे एवढे फायदे माहितीयेत?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.