Vat Purnima 2024 : पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमाच नव्हे तर 'ही' व्रतंसुद्धा केली जातात

Vat Purnima 2024 : भारतात लग्न होण्याच्या आधीपासूनच कुमारींसाठी अनेक प्रकारचे व्रत असतात
Vat Purnima 2024
Vat Purnima 2024esakal
Updated on

Vat Purnima 2024 :

हिंदू धर्मात सर्वच नात्यांचे प्रेम वाढवणारे, आपुलकी जपणारे दिवस आहेत. भावासाठी असलेली रक्षाबंधन तर आई वडील-गुरूसाठी असलेली गुरूपौर्णिमा होय. तसेच पती-पत्नीच्या नात्यासाठीही अनेक व्रत वैकल्य केली जातात. हिंदू संस्कृतीत पतीसाठी वट पौर्णिमाच नाहीतर अनेक उपवास केले जातात. अनेक गोष्टींची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास केले जातात.

भारतात लग्न होण्याच्या आधीपासूनच कुमारींसाठी अनेक प्रकारचे व्रत असतात. ज्यात हरतालिका, करवा चौथ असेही उपवास केले जातात. हे उपवास चांगला पती मिळावा यासाठी हे व्रत केले जातात. तर, पतीच्या दीर्घायुष्यासाठी लग्न झाल्यानंतर सुहासिनी महिला अनेक प्रकारचे उपवास करतात.  ते कोणते हे पाहुयात.

Vat Purnima 2024
Vat Purnima 2023 : वट पौर्णिमेला पारंपरिक पूजे बरोबर करा हे उपाय, घर सुख-समृद्धीने भरेल

करवा चौथचा उपवास

हिंदू धर्मात, करवा माता, शिव-पार्वती, भगवान गणेश आणि भगवान कार्तिकेय यांच्या उपासनेशी संबंधित हे व्रत दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला केले जाते. हिंदू मान्यतेनुसार करवा मातेच्या आशीर्वादाने महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. स्त्रिया या दिवशी निर्जल उपवास करतात आणि संध्याकाळी चंद्र देवाची पूजा केल्यानंतरच उपवास सोडतात.

Vat Purnima 2024
Vat Purnima : वटपौर्णिमेला दारात काढा अशी खास रांगोळी, बघा डिझाइन्स

हरतालिकेचा उपवास

हा उपवास करणाऱ्या मुलींना योग्य वर मिळतो, लग्नातील अडथळे दूर होतात असे मानले जाते. तर, ज्या विवाहित महिला हे उपवास करतात. त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे म्हणतात.  दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्लपक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचा उपवास करतात.

हिंदू मान्यतेनुसार या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी जेव्हा स्त्रिया शिव आणि पार्वतीची विधीपूर्वक पूजा करतात तेव्हा त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते.

हरतालिकेचा उपवास
हरतालिकेचा उपवास
Vat Purnima 2024
Vat Purnima 2024 : वटपौर्णिमेला झटपट मेकअप करून, मस्त तयार व्हायचंय? मग, 'या' सोप्या टिप्स करा फॉलो

मंगळा गौरी व्रत

हिंदू धर्मात श्रावण महिन्यातील मंगळवारी मंगळा गौरी व्रत पाळण्याची परंपरा आहे. या व्रताचा संबंध माता पार्वतीच्या उपासनेशी आहे. असे मानले जाते की हे व्रत केल्याने केवळ विवाहित महिलांनाच सुखी वैवाहिक जीवनाचा आशीर्वाद मिळत नाही, तर अविवाहित मुलींना इच्छित वर लाभतो.

कजरी उपवास

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीयेला महिला आपल्या पतीच्या सुख आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात. कजरी व्रताला सतुडी तीज असेही म्हणतात. हिंदू मान्यतेनुसार हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या पतीचे आयुष्य वाढते. माता पार्वतीने अनेक वर्षे तपश्चर्या केली होती. ज्या दिवशी त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेले महादेव त्यांना भेटले, तो दिवस भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया होता.

Vat Purnima 2024
Vat Purnima 2023 : वडाची पूजा कशी करावी; जाणून घ्या साहित्य व सविस्तर पूजा विधी

आशुन्या शयन व्रत

हिंदू परंपरेत पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी आशुन्या शयन व्रताचे धार्मिक महत्त्व मानले जाते. या व्रतामध्ये महिला विशेषतः भगवान श्री विष्णू आणि जगाचे पालनपोषण करणाऱ्या माता लक्ष्मीची पूजा करतात. दरवर्षी चातुर्मासात हे व्रत पाळले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.