Vat Purnima 2024
Vat Purnima 2024esakal

Vat Purnima 2024 : वट पौर्णिमेला बनवा ही स्पेशल कचोरी, पदार्थ पाहून पतीदेवही करतील तुमच्यासाठी उपवास

या उपवासाला काही स्त्रीया केवळ पाणी, तर काही महिला साबुदाण्याची खिचडी खाता
Published on

Vat Purnima 2024 :

वट पौर्णिमा हा सण पती-पत्नीच्या प्रेमाचे प्रतिक आहे. हाच पती सात जन्म लाभावा यासाठी सुहासिनी स्त्रीया या दिवशी उपवास करतात. वडाच्या झाडाची पूजा करतात. या दिवशी अखंड व्रत केलं जातं.

राज्यातील काही भागातील स्त्रीया वडाची पूजा करे पर्यंतच व्रत करतात. तर काही, भागात संपूर्ण दिवस उपवास केला जातो. उत्तर भारतातही करवा चौथचा उपवास महत्त्वाचा मानला जातो.

Vat Purnima 2024
Vat Purnima 2024 : यंदाच्या वटपौर्णिमेला करा मराठमोळा साज, 'या' प्रकारच्या साड्या नेसून करा पूजा, दिसाल एकदम झकास.!

या उपवासाला काही स्त्रीया केवळ पाणी, तर काही महिला साबुदाण्याची खिचडी खातात. पण, उपवासाला काही वेगळं खायचं असेल तर तुम्ही उपवास स्पेशल कचोरी बनवू शकता. उपवासाची कचोरी कशी बनवायची, त्याचे साहीत्य-कृती पाहुयात.

Vat Purnima 2024
Vat Purnima 2023 : 'जन्मोजन्मी हीच पत्नी हवी'; रुपाली चाकणकरांच्या पतीने वडाला मारल्या फेऱ्या

सारणासाठी साहित्य :

२ वाट्या खोवलेला ओला नारळ, १ मूठ कोथिंबीर बारीक चिरून, ४ मिरच्या वाटून, ५० ग्रॅम काजू तुकडा, थोडे बेदाणे, १ लिंबाचा रस, चवीनुसार मीठ व साखर.

कव्हरकरता साहित्य :

अर्धा किलो बटाटे, १०० ग्रॅम आरारूट, मीठ, तळण्याकरता वनस्पती तूप.

Vat Purnima 2024
Vat Purnima 2023 : जन्मोजन्मीच्या सोबतीसाठी वडाला साकडे! शहर परिसरात वटपौर्णिमा अपूर्व उत्साहात

कृती :

  • बटाटे उकडून सोलून गरम असताना किसणीवर किसावे किंवा पुरणयंत्रातून काढावे. किसणीला किंवा पुरणयंत्राला तेलाचा हात लावावा.

  • बटाट्याच्या किसलेल्या गोळ्यात मीठ व आरारूट घालून गोळा तयार करावा.

  • खोवलेल्या खोबऱ्यात कोथिंबीर, वाटलेल्या मिरच्या, काजू, बेदाणे, मीठ, लिंबाचा रस व थोडी जास्त साखर घालून सारण हलक्या हाताने मिसळावे. सारण आंबट गोडसर हवे.

  • किसलेल्या बटाट्याच्या २० ते २५ गोळ्या कराव्यात. प्रत्येक गोळ्याची तुपाच्या हाताने वाटी करून १ टी स्पून सारण भरून तोंड बंद करावे. अशा सर्व कचोऱ्या भराव्यात. ह्या कचोऱ्या हाताने चपट्या करायच्या नाहीत.

  • कढईत भरपूर तुपात मंद आचेवर गुलाबी रंगावर तळाव्यात.

  • नारळ, कोथिंबीर, दाण्याचे कूट, मीठ, साखर यांच्या सरसरीत चटणीबरोबर द्याव्यात. वरील साहित्यात २४ ते २५ छोट्या गोल कचोऱ्या होतात.

Vat Purnima 2024
Vat Purnima 2023 : पौर्णिमा नक्की कधी? ३ जून की ४ जून? जाणून घ्य़ा मुहुर्त व महत्त्वाच्या वेळा

कचोऱ्या उपवासाला वापरायच्या असल्यास त्यात आरारूट घालावे अन्यथा कॉर्नफ्लोअर वापरले तरी चालते. उपवासाला चालतात म्हणून वनस्पती तुपामध्ये तळाव्यात, नाहीतर रिफाईंडमध्ये तळून चांगल्या होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com