जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी भारतीय महिला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करतात. सोबतच आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी उपवासदेखील करतात. आता वटपौर्णिमा नेमकी का केली जाते यामागील कारण साऱ्यांनाच ठावूक आहे. आपल्या पतीचे प्राण पुन्हा मिळवण्यासाठी सावित्रीने तीन दिवस यमराजासोबत शास्त्रचर्चा केली होती. त्यानंतर तिच्यावर प्रसन्न होऊन यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले होते. तेव्हापासून सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून वटपौर्णिमा केली जाते. परंतु, वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला दोरा (सूत) का गुंडाळतात ते माहित आहे का? (Vatpurnima-2021-the-importance-of-vatvruksh-and-sut)
अनेक महिला शास्त्र असल्याचं समजून वडाला दोरा गुंडाळतात. प्रत्यक्षात दोरा गुंडाळण्यामागे शास्त्र जरी असलं तरीदेखील त्याला आणखी एक कारणसुद्धा आहे.
वटवृक्षाच्या खोडावर असलेल्या उभ्या छेदांमधून सुप्त लहरी या शिवतत्त्व आकृष्ट करतात. आणि, त्या वायुमंडलात प्रक्षेपित करतात. ज्यावेळी स्त्रिया वडाच्या खोडाला सुती धागा गुंडाळतात. त्यावेळी खोडातील शिवत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होतात व आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी ग्रहण करण्यास सुलभ होतं.
दरम्यान, भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण, उत्सव यांना विशेष महत्त्व आहे. त्यासोबतच त्याच्यामागे काही अध्यात्मिक आणि धार्मिक कारणंदेखील आहेत. म्हणूनच, आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी मिळावा यासाठी भारतीय महिला वटसावित्रीची पूजा करतात. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते.
(वरील माहिती ही सर्वसामान्य ज्ञान आणि शास्त्रानुसार देण्यात आली आहे. यातून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा गैरसमज पसरवण्याचा हेतू नाही.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.