Viral Story : काय! या दुकानातून दिवसाला विकले जातात १० हजार समोसे, काय आहे बिझनेस फॉर्म्युला

या दुकानदाराचा यशाचा सिक्रेट मंत्रा काहीतरी वेगळाच आहे
Viral Story
Viral Storyesakal
Updated on

 Viral Story : द्रोणात असलेला गरमागरम समोसा, त्यावर घातलेली आंबट गोड चटणी आणि बारीक शेव आहाहा.. तोंडाला पाणीही सुटतं अन् सामोश्याने वेगळी चव येते. सध्या काही लोकांचे स्टार्टअप इतके फेमअस आहेत की, बस विचारू नका, दुकान उघडायच्या आधीच  काही दुकानांबाहेर गर्दी जमलेली असते.

आपल्यापैकी बरेच जण, आठवड्यातून कधी ना कधी बाहेर खाण्याचा प्लॅन करतात. स्वादिष्ट स्ट्रीट स्नॅकची निवड करतात. आज आपण अशाच एका स्ट्रिट फूड विक्रेत्याबद्दल जाणून, ज्याच्या यशाचा सिक्रेट मंत्रा काहीतरी वेगळाच आहे. कारण, हा विक्रेता दररोज १०,००० समोसे विकतो.

Viral Story
Devendra Fadnavis BJP Viral Video : फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ, राज्याच्या राजकारणात नवा भूकंप?

हैदराबादमधील एका दुकानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे. काही लोक या पाककृतीचे कौतुक करत आहेत. तर काहींना ही मोठी उपलब्धी मानली नाही आणि समोसे दुकानातील स्वच्छतेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.

रेग्युलर समोसे असतात तसेच हेही बनवले जातात. मैद्यांच्या चपातीवर स्टफिंग भरून त्या त्रिकोणी आकारात बनवले जातात. आणि मंद आचेवर फ्राय केले जातात.

Viral Story
Viral Video : 150 हून अधिक मांजरांची आई आहे एक कुत्रा; पोस्ट पाहून येईल रडू

सामोसा बनवण्याची पद्धत सेम असली तरी चवीकडे अधिक प्राधान्य दिलं की व्यवसाय आपोआप वाढतो हेच या बिझनेसचे सक्सेस सिक्रेट आहे. चवीत न केलेला बदल, तसेच वेळेवर ग्राहकांना सामोश्याचा पुरवठा होतो यामुळेच व्यवसाय वाढला आहे, असे हॉटेल मालकांनी सांगितले. 

या व्हिडिओवर काही नेटकऱ्यांनी जागा अस्वच्छ आहे, सतत उकळून काळं झालेलं तेल विषाप्रमाणेच आहे, असा प्रतिक्रियाही दिल्या आहेत. या गोष्टी असल्या तरी त्या पदार्थाची लोकप्रियता अन् चवीत फरक पडलेला नाही. काही लोकांनी या व्यावसायिकांचे कौतुकही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.