Health Care : जर तुम्हाला अशक्तपणा आला असेल आणि शरीरात थकवा जाणवत असेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. ही दोन्ही प्रमुख लक्षणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
मात्र, या लक्षणांसोबतच त्वचा पांढरी पडली असेल, दृष्टी कमी झाली असेल आणि हातांचा थरकाप होत असेल तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता असू शकते.
व्हिटॅमिन्सचा शरीराला योग्य पुरवठा झाला नाही तर, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याचा धोका नाकारता येत नाही. व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे हातांचा थरकाप होतो, चक्कर येते आणि अशक्तपणा येतो आणि इतर अनेक समस्या दिसून येतात.
या व्हिटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही काही खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. कोणते आहेत हे खाद्यपदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.
व्हिटॅमिन B 12 चा आणखी एक चांगला स्त्रोत म्हणजे दूध होयं. दूधामध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, दूध हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे.
दूधामध्ये व्हिटॅमिन B 12 सोबतच कॅल्शिअम आणि व्हिटॅमीन D चे ही भरपूर प्रमाण आढळून येतो. हातांचा थरकाप, अशक्तपणा, चक्कर येणे इत्यादी समस्या दूर करण्यासाठी दूधाचा आहारात अवश्य समावेश करा.
चांगल्या आरोग्यासाठी अंड्याचा आहारात समावेश असणे हे फार महत्वाचे आहे. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन्सचे प्रमाण आढळून येते.
यासोबतच अंडी हे व्हिटॅमिन B12 चा उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे, या व्हिटॅमिन्सची कमतरता भरून काढण्यासाठी अंड्यांचा आहारात अवश्य समावेश करा. यासाठी रोज उकडलेली २ अंडी अवश्य खा.
दूधाप्रमाणचे दही देखील आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. दूधाप्रमाणेच दही देखील व्हिटॅमीन B12 चा उत्तम स्त्रोत आहे. दह्यामुळे, शरीराला कॅल्शिअम, व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमीन D देखील मिळते.
व्हिटॅमिन D आणि व्हिटॅमिन B 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही रोज दही खाऊ शकता. फक्त हिवाळ्यात मर्यादित प्रमाणात दह्याचे सेवन करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.