हे आहेत वोडक्याचे हटके फायदे; नक्की वाचा

दारूमुळे अनेक फायदे होतात, अस म्हटल तर विश्वास बसणार नाही
Vodka
VodkaVodka
Updated on

दारू (Liquor) शरीरासाठी हानिकारक आहे, असे म्हटले जाते. मात्र, त्याचे योग्य प्रमाणात सेवन केले तर फायदेही होतात. डॉक्टरही काही प्रमाणात दारू पिण्याचा सल्ला देतात.(?) खरं पाहिले तर कोणतीही वस्तू प्रमाणापेक्षा जास्त घेतल्यास नुकसान होते, हे सर्वांना माहिती आहे. मग ती दारू असो किंवा दुसरं काही.

अल्कोहोल आरोग्यासाठी हानिकारक आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. दारूमुळे शरीराचे अनेक नुकसान होते. ते प्यायल्यानंतर व्यक्तीचे संवेदनाही हरवतात. परंतु, तुम्हाला दारूमुळे अनेक फायदे होतात, अस म्हटल तर विश्वास बसणार नाही. वोडक्याचे (Vodka) असेच हटके फायदे (Liquor) सांगणार आहोत.

Vodka
क्रुरतेचा कळस! मृत्यूपूर्वी तिला खणायला लावली स्वतःची कबर

हे आहेत फायदे

  • खूप ताप आला असेल तर पाण्यामध्ये वोडका टाकून कापड भिजवून घ्या. हे कापड पिळून डोक्यावर ठेवा. यामुळे ताप कमी होण्यास मदत होईल.

  • शॅम्पूमध्ये थोडासा वोडका टाकून केस धुवा. अस केल्याने केस मजबूत होतील. केस गळण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच केस तेलमुक्त आणि सिल्की होतील.

  • एक कप व्होडका आणि एक कप पाणी एकत्र करून काच पुसल्याने काच चमकतो.

  • त्वचा निरोगी आणि चांगली ठेवायची असेल तर कापसाला वोडका टाका आणि चेहरा स्वच्छ करा. नियमित अस केल्याने त्वचा चांगली राहील.

  • कान दुखत असेल तर वोडक्याचे काही थेंब टाका आणि पाच मिनिटांनी कान स्वच्छ करून घ्या.

  • व्होडक्याच्या थेंबामुळे कान दुखण्याला कारणीभूत असलेल्या बॅक्टेरिया नष्ट होतात.

  • बाटलीभर पाण्यामध्ये वोडक्याचे काही थेंब आणि एक चमचा साखर टाका. हे मिश्रण फुलांवर स्प्रे करा. यामुळे फुलं बराचवेळ ताजे राहतील.

  • थोडीशी वोडका बुटांवर टाका आणि कपड्याने बूट पुसून घ्या. अस केल्याने बूट चमकतील.

  • शरीराच्या एखाद्या अवयामध्ये वेदना होत असतील तर थंड पाण्यामध्ये वोडका टाका आणि बर्फ तयार करा. आता हा बर्फ वेदना असलेल्या ठिकाणी लावल्याने आराम मिळेल.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी ‘सकाळ ऑनलाइन’चा कोणताही संबंध नाही. वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.