शौचानंतर धुण्याची भारतीय पद्धत योग्य की पुसण्याची पाश्चात्य पद्धत ?

ज्यांना शौचानंतर धुण्याची सवय असते त्यांना ते पुसणाऱ्यांपेक्षा पुरळ, अस्वस्थता आणि चिडचिड कमी जाणवते
wiping buttock
wiping buttockgoogle
Updated on

मुंबई : स्वच्छता, नीटनेटकेपणा, अद्ययावत जीवनशैलीसाठी बहुतांशी ओळखल्या जाणाऱ्या पाश्चात्यांसमोर आता भारतीयांची मान ताठ झाली आहे. एका गोष्टीमुळे भारतीय हे पाश्चात्यांपेक्षा उजवे ठरत आहेत आणि ती गोष्ट म्हणजे 'धुण्याची' पद्धत.

शौचास गेल्यानंतर धुण्याऐवजी ते टीप कागदाने (tissue paper) पुसणे ही पाश्चात्यांची पद्धत आहे. वरकरणी पाहाता यात पाण्याची काटकसर दिसत असली तरी ही पद्धत आरोग्यासाठी फारशी चांगली नाही. याउलट पार्श्वभाग पाण्याने धुण्याची भारतीय पद्धतच अधिक चांगली असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

धुणे चांगले की पुसणे चांगले, यावर वर्षानुवर्षे वाद होत आला आहे. करोनामुळे जगभर लागू झालेल्या टाळेबंदीमुळे पाश्चात्य देशांमध्ये toilet paperचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना पार्श्वभाग पुसण्याऐवजी धुण्यास सांगितले होते.

"एखादा कागदाचा तुकडा विष्ठा आणि जंतू कसे नाहीसे करू शकतो", असा प्रश्न उपस्थित करत "पाण्याने धुतल्याने सर्व जंतू नाहीसे होतात", याकडे The Urology Groupचे Dr. Phillip Buffington यांनी लक्ष वेधले आहे. कॅलिफोर्नियाचे colorectal and general surgeon Dr. Allen Kamrava यांचे म्हणणे आहे की, "ज्यांना धुण्याची सवय असते त्यांना ते पुसणाऱ्यांपेक्षा पुरळ, अस्वस्थता आणि चिडचिड कमी जाणवते".

न्यूयॉर्कचे rectal surgeon Dr. Evan Goldstein यांच्या म्हणण्यानुसार, एखादी व्यक्ती आपला पार्श्वभाग हळूवारपणे पुसत नसेल तर त्या व्यक्तीला गुदद्वारावर जखम होऊ शकते. तसेच कठोरपणे पुसल्याने त्या जखमा गंभीर होऊ शकतात. शिवाय toilet paperमध्ये bleach असते जे त्वचेसाठी चांगले नसते.

तुम्ही जेव्हा फक्त पुसता तेव्हा विष्ठा त्वचेवर तशीच राहण्याची शक्यता असते. त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. पाण्याने धुणे हे योनीसाठी सौम्य ठरते व पाण्याचा वापरही कमी करावा लागतो. Scientific American मधील नोंदीनुसार toilet paperचा एक रोल बनवण्यासाठी १४० लीटर पाण्याची गरज असते. त्यामुळे पार्श्वभाग पुसण्यापेक्षा धुणे अधिक श्रेयस्कर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच पार्श्वभाग धुतल्यानंतर प्रत्येकाने आपले हात साबणाने व पाण्याने धुणे आवश्यक असल्याचे त्यांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.