Water In Dream : तुम्हाला स्वप्नात पाणी दिसतं का? जाणून घ्या अर्थ

तुम्हाला जे स्वप्न दिसतात त्याचं विश्लेषण करून ते स्वप्न म्हणजे काही पूर्वाभास आहे की, संकेत याचा अंदाज बांधणं शक्य होतं.
Water In Dream
Water In Dreamesakal
Updated on

Dream Astrology Water In Dream : स्वप्नशास्त्रानुसार तुम्हाला जर कोणतं स्वप्न पुन्हा पुन्हा पडत असेल तर त्याला संकेत समजून त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. वेगवेगळ्या गोष्टींचा अर्थ वेगवेगळा असतो. तसंच स्वप्नात कायम पाणी दिसत असेल तर पाणी किती प्रमाणात आणि कोणत्या प्रकारात दिसतं त्यावरून त्याचा अर्थ समजतो. जाणून घ्या.

1. जेंव्हा स्वप्नात तुम्ही पाण्यात मस्ती करत असल्याचं बघतात, तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या मनाशी आणि आत्म्याशी एकाग्र होत आहात. आपल्या भावना एक ताकद आहे. त्याविषयी विचार करायला हवा. यामुळे आयुष्यातला एक सखोल अनुभव मिळतो.

Rever In Dream
Rever In Dreamesakal

2. जर तुम्हाला स्वप्नात वाहतं पाणी दिसत असेल आणि त्यासोबत तुम्हीही वाहत असाल तर हा चांगला संकेत समजला जातो. याचा अर्थ असा होऊ शकतो की, जीवन तुम्हाला सकारात्मक दिशेने घेऊन जात आहे. जर शांत नदी किंवा पाणी दिसत असेल तर याचा अर्थ आहे की, तुमच्या जीवनात जागृत अवस्थेत होत असलेल्या बदलांना तुम्ही शांततेत घेत आहात.

Water In Dream
Face Feature Astrology: महिलांमध्ये असलेली ही सौंदर्य वैशिष्ट्ये ठरू शकतात आयुष्यातील भरभराटीचं कारण

3. पाण्याचे स्वप्न तुमच्या सूप्त भावनांचं प्रतिनिधीत्व करतात. जर तुम्ही ते जाणत असाल तर कदाचित त्या दाबल्या जात असू शकतात. पण मग त्या एवढ्या खोलवर जातात की, तुम्हाला समजतही नाही. त्यामुळे जागेपणीपण तुम्ही चिंतीत किंवा अस्वस्थ असतात. पण असं का होतं हे तुम्हाला समजत नाही.

Water In Dream
Dream Astrology : स्वप्नांना हलक्यात घेऊ नका; 'या' गोष्टी दिसल्या तर धनलाभाची शक्यता

4. स्वप्नात स्वच्छ पाणी दिसणं हे सकारात्मक प्रतिक आहे. जर तुम्ही पोहत आहात किंवा स्वच्छ पाण्याच्या काठी बसलेले असाल तर कदाचित तुम्ही तुमच्या भावनांच्या संपर्कात आहात. तुम्ही तुमच्या जीवनाविषयी कसा अनुभव करतात त्याविषयी अगदी स्पष्ट आहात.

Sea In Dream
Sea In Dreamesakal

5. जर स्वप्नात समुद्राचं पाणी बघत असाल तर हा अशुभ संकेत समजला जातो. स्वप्नशास्त्रानुसार असं स्वप्न बघणाऱ्या व्यक्तीने भविष्यात सावधान राहण्याची आवश्यकता आहे. स्वप्नात नदीचं पाणी दिसणं शुभ मानलं जातं.

Water In Dream
Dream : तुम्हाला लग्नाचे स्वप्न पडत असेल तर वेळीच जागे व्हा, शुभ-अशुभ जाणून घ्या

6. या उलट काही वेळा समुद्र दिसणं हा शुभ संकेत असतो. करिअरमध्ये प्रगतीचं लक्षण समजलं जातं.

7. समुद्र जसं आतलं किनाऱ्यावर आणतं तसंच तुम्हाला आत खोल खोल घेऊन जातं. समुद्राचं स्वप्न बदल, रोमांच आणि भिती विषयी संकेत देतं. जे तुम्हाला दूर करता यायला हवा. या स्वप्नातून तुमच्या ताकदीची आणि कमतरतांची ओळख होते.

8. महासागर पृथ्वीवर जीवन आणि संहाराचं प्रतिक आहे. महासागराला स्थिरतेच्या प्रतिकाच्या रुपात बघता येतं. कारण पृथ्वीच्या सुरूवातीपासून समुद्र इथं आहे.

9. समुद्राला कायम रहस्य, अनंत, शांत, आशा आणि सत्यतेचं प्रतिक समजलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.