Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

१२ नोव्हेंबर रोजी देव उठणी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात, त्यानंतर विवाहासह शुभ कार्ये पुन्हा सुरू होतात.
Wedding Dates
Wedding Dates esakal
Updated on

Wedding Dates :  

हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी विवाह हा प्राथमिक संस्कारांपैकी एक मानला जातो. विवाह सोहळ्यासाठी शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व दिले जाते. हिंदू धर्मात, कोणत्याही विधी, पूजा, विवाह किंवा शुभ कार्यासाठी शुभ वेळ निवडणे आवश्यक मानले जाते.

१२ नोव्हेंबर रोजी देव उठणी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात, त्यानंतर विवाहासह शुभ कार्ये पुन्हा सुरू होतात. या दिवशी तुळशी आणि शाळीग्रामच्या विवाहाने पुन्हा विवाह सोहळ्याला सुरुवात होईल. 2024 च्या उरलेल्या दोन महिन्यांत नोव्हेंबर आणि डिसेंबर या लग्नासाठी मुख्य शुभ मुहूर्त खालीलप्रमाणे आहेत.

Wedding Dates
Chetan Sakariya Wedding : गुपचुप गुपचुप...! टीम इंडियाचा खेळाडू अडकला लग्नबंधनात; फोटो व्हायरल

दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी चातुर्मास समाप्ती आणि तुलसीविवाहरंभ आहे. ज्योतिष शास्त्रानुसार यानंतर विवाहाचे आणि मुंजीचे मुहूर्त असतात. त्यानुसार या काळात १७  नोव्हेंबर २०२४ पासून ०८ जून २०२५ पर्यंत एकूण ६४ दिवस विवाहांचे मुहूर्त आहेत. तर, या काळात मुंजींचे एकूण २२ मुहूर्त आहेत, असे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉक्टर अनिल वैद्य यांनी सांगितले.

विवाहाचे मुहूर्ताचे दिवस खालील प्रमाणे आहेत.

नोव्हेंबर २०२४ - १७, २३,२६,२७.

डिसेंबर २०२४ - ३,५,६,७,११,१२,१४,१५,२०,२३,२४,२६.

जानेवारी २०२५ - १६,१७,१९,२१,२२,२६.

फेब्रुवारी २०२५ - ३,४,७,१३,१६,१७,२०,२१,२२,२५.

मार्च २०२५- १,२,३,७,१२,१५,१६.

एप्रिल २०२५- १४,१८,१९,२०,२१,२२,२५,३०.

मे २०२५ - १,६,७,८,९,१०,१३,१४,१६,१८,२३,२४.

जून २०२५-  २,४,५,६,८.

Wedding Dates
Anant Radhika Post Wedding : अनंत राधिकाच्या लग्नानंतर आता पोस्ट वेडिंग पार्टीचा जल्लोष..! ब्रिटनमधील हॉटेल मालकानं दिलं स्पष्टीकरण...

यानंतर शनिवार दिनांक तुलसी विवाह नंतरच म्हणजे २२ नोव्हेंबर २०२५ नंतरच विवाहाचे मुहूर्तांचे दिवस आहेत. असे ज्योतिषाचार्य वैद्य यांनी सांगितले.

या काळात शुक्राचा अस्त १९ मार्च २०२५ ते २६ मार्च २०२५ तर गुरुचा अस्त १३ जून २०२५ ते ०६ जुलै २०२५ पर्यंत आहे.  विवाह आणि मुंजीसाठी गुरुबळ आवश्यक असते. त्यामुळे या कार्याच्या आधी मुहूर्त काढताना त्यादिवशी वधू वर किंवा मुंजी करण्यात येणाऱ्या मुलांना गुरुबळ आहे की नाही पाहिला पाहिजे, ते ज्योतिषाकडे जाऊन पाहिल्यानंतरच मुहूर्त काढावेत असा सल्ला डॉक्टर अनिल वैद्य यांनी दिला आहे.

Wedding Dates
Ambani Wedding : अंबानीच्या लग्नात 'बिन बुलाए' घुसला युट्यूबर; मुंबई पोलिसांनी केला पाहुणचार

या राशींना नसेल गुरूबळ

१४ मे २०२५ पर्यंत गुरु वृषभ राशीत राहील, त्यामुळे या सुमारास मिथुन, तूळ आणि कुंभ राशींना गुरुबळ राहणार नाही.  १५ मे २०२५ नंतर गुरु मिथुन राशीत राहील, त्यामुळे कर्क ,वृश्चिक आणि मीन राशींना गुरुबळ लाभणार नाही. यासाठी ज्यांच्यासाठी कार्य करायचे आहे. त्यांच्यासाठी गुरुची शांती, जप वगैरे करूनच कार्य करायला पाहिजे असं शास्त्रात सांगितलेलं आहे.

 

मुंजीचे मुहूर्त खालील तारखांना आहेत

जानेवारी २०२५...३१.

फेब्रुवारी २०२५..३,७,९,१४

मार्च २०२५...२,९,१०.

एप्रिल २०२५..२,३,७,९.

मे २०२५.. १,२,७,१४,१८,२८,२९.

जून २०२५..१,५,६.

येणाऱ्या वर्षात जुलै २०२५ ते डिसेंबर २०२५ काळात मुंजीचे मुहूर्त नाहीत.

Wedding Dates
Aamir Khan Wedding: तिसऱ्या लग्नाच्या चर्चांवर अखेर आमिर खाननेच टाकला पडदा; हो की नाही? काय म्हणाला अभिनेता

जर गुरु आणि शुक्र अस्तकाळात विवाह करणे अगदीच अनिवार्य असेल तर तो कोणत्याही दिवशी न करता विवाहयोग्य तिथे नक्षत्रावर तरी करावे याच हेतूने पुढील दिवस देत आहे. म्हणजे अगदी अडचणीच्या वेळीच हे मुहूर्त घ्यावेत असे डॉक्टर अनिल वैद्य यांनी सांगितले.

जून २०२५ - १२,१५,१६,१९,२०,२९.

जुलै २०२५ - १,३,४.

अस्त काळातील मुहूर्त काढताना ज्योतिषाच्या सल्ल्यानुसारच निर्णय घ्यावा. तुमचा संसार यशस्वी होऊन जीवनात त्यांच्या नंदनवन फुलावे या दृष्टीने इतर गोष्टींबरोबरच त्या दोघांच्या जन्म पत्रिकेतील गुण मिलन आणि कुंडली मिलन होतं की नाही यासंबंधी सुद्धा मार्गदर्शन ज्योतिषाचार्य कडून घेतल्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा.

Wedding Dates
Jalgaon Wedding Muhurat : यंदा 8 महिन्यांत लग्नाचे 52 मुहूर्त! 18 नोव्हेंबरपासून सुरूवात; कार्यालय बुकिंगला सुरूवात

जर दोघांच्या पत्रिकेत काही दोष असतील त्याचं निवारण सुद्धा लग्नाच्या आधीच केलं तर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात त्यांना त्रास होणार नाही असं आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉक्टर अनिल वैद्य यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()