Wedding Special : लग्नासाठी जास्त खर्च करण्याची गरज नाही; कमी बजेटमध्ये अशी करा आकर्षक स्टेज सजावट

कमी बजेटमध्ये स्टेज डेकोरेशनचे चांगले आणि आकर्षक पर्याय तुम्ही निवडू शकता.
Wedding Special
Wedding Specialesakal
Updated on

Wedding Special : आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवसांपैकी एक असलेला दिवस कोणता? असे विचारल्यावर अनेकांचे उत्तर लग्न असे असेल. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर आणि अविस्मरणीय दिवस असतो. त्यामुळे, हा दिवस खास बनवण्यासाठी आपण कोणतीच कसर सोडत नाही.

लग्नामध्ये वधू-वरांचे आऊटफीट्स, मेकअप यासोबतच लग्नातील मंडप हा देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे, हा लग्नातील स्टेज आकर्षक कसा दिसेल? याचे डेकोरेशन कोणत्या प्रकारचे असावे? असा प्रश्न अनेकांना पडतो.

आजकाल या स्टेज डेकोरेशनच्या किंमती जरी वाढल्या असल्या तरी सुद्धा तुम्ही कमी बजेटमध्ये स्टेज डेकोरेशनचे चांगले पर्याय निवडू शकता. आज आम्ही तुम्हाल त्या संदर्भात माहिती देणार आहोत. बजेटफ्रेंडली स्टेज डेकोरेशनचे काही ऑप्शन आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Wedding Special
Wedding Special : १७ कोटींची साडी आणि ३० लाखांचा मेकअप; ‘ही’ आहे देशातील सर्वात महागड्या लग्नाची गोष्ट

फ्लोरल सेटअप

लग्नमंडपासाठी फ्लोरल सेटअपची निवड करणे हा नेहमीच चांगला आणि बजेटफ्रेंडली पर्याय आहे. आजकाल या प्रकारच्या सेटअपला मागणी वाढली आहे. या प्रकारात तुम्ही मंडपची सजावट सिंपल ठेवून त्यावर सुंदर फुलांचा साज सजवू शकता. यामुळे, सिंपल डेकोरेशन ही तितकेच खुलून दिसेल.

या प्रकारच्या सेटअपमध्ये तुम्ही वेगवेगळ्या रंगांच्या फुलांचा वापर करू शकता. त्यासोबतच काही ताजी फुले आणि काही कृत्रिम वनस्पतींचा वापर तुम्ही करू शकता. कृत्रिम रोपे दिसायला तितकीच सुंदर दिसतात आणि अगदी सहजपणे मार्केटमध्ये मिळतात. फ्लोरल सेटअपला अधिक सुंदर बनवण्यासाठी तुम्ही स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठे आणि आकर्षक फ्लोरलपॉट्स ठेवू शकता.

रंग आधारित सेटअप

लग्नातील मंडप हा प्रत्येक वधू-वरासाठी महत्वाचा असतो. कारण, याच मंडपाच्या स्टेजवर त्यांना त्यांच्या नवीन आयुष्याची सुरूवात करायची असते. रंग आधारित सेटअप हा देखील मंडप सजावटीसाठी उत्तम आणि बजेटफ्रेंडली पर्याय ठरू शकतो.

यासाठी तुम्ही वधू-वरांच्या आवडत्या रंगांचा अनोख्या पद्धतीने वापर करू शकता. ज्यामध्ये विविध रंगांच्या शेड्सचा वापर करता येईल. यामध्ये लवेंडर, लाल, ग्रीन आणि पेस्टल शेड्समधील रंगांना अधिक पसंती असते.

कॅंडल्स आणि फ्लोरल सेटअप

कमी बजेटच्या स्टेजच्या सजावटीच्या बाबतीत लोक अधिक सर्जनशील होत आहेत. बजेटफ्रेंडली स्टेजची निवड जरी करायची असली तरी सुद्धा त्यात वैविध्य कसे आणता येईल?याचा विचार आजकालचे लोक करताना दिसतात.

कॅंडल्स आणि फ्लोरल सेटअप हा देखील एक उत्तम पर्याय ठरू शकते. या प्रकारच्या सेटअपमध्ये विविध रंगांच्या आणि विविध सुगंधांच्या कॅंडल्सचा वापर प्रामुख्याने केला जातो. कॅंडल्ससोबत आकर्षक फुलांचा वापर देखील केला जातो.

या प्रकारची सजावट ही दिसायला सुंदर आणि हटके देखील वाटते. शिवाय, याचा खर्च ही तुमच्या खिशाला परवडतो, त्यामुळे, आजकाल जोडप्यांची या कॅंडल्स आणि फ्लोरल सेटअपच्या सजावटीला मागणी वाढली आहे.

Wedding Special
Wedding Season: तुलसी विवाहानंतर आता लग्नसोहळ्यांचा धूमधडाका; वधू-वर संशोधन मोहिमेस वेग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.