Weight Loss Tips: हा एक पदार्थ खा अन् मिळवा रकुल प्रीत सारखी फिटनेस अन् स्लीम फिगर

रकूल प्रितसारखी फिगर आणि फिटनेस हवी असेल ती खात असलेल्या या खास पदार्थाबाबत तुम्ही एकदा जाणून घ्यायलाच हवे
Weight Loss Tips
Weight Loss Tipsesakal
Updated on

Rakul Preet Weight Loss Tips: टेलिव्हीजनवरील चर्चित अभिनेत्री रकूल प्रित सारखी फिगर आपलीही असावी असे अनेक तरुणींचे स्वप्न असते. रकूल प्रितच्या फिटनेसबरोबरच तिच्या स्लीम फिगरसाठीही ती चर्चेत असते. तेव्हा तुम्हालाही रकूल प्रितसारखी फिगर आणि फिटनेस हवी असेल ती खात असलेल्या या खास पदार्थाबाबत तुम्ही एकदा जाणून घ्यायलाच हवे.

वेट लॉससाठी खा ही गोष्ट

कारले हे चवीने कडू असले तरी त्याचे फायदे तुम्हाला कळल्यावर तुम्ही त्याचा कडूपणा बाजूला ठेवून नक्कीच कारले खायला सुरुवात कराल. तेव्हा आज तुमच्या डाएटमध्ये कारल्याचा समावेश करून घ्या. कारल्यामध्ये कॅलरीज फार कमी असतात. सोबतच यामध्ये विटॅमिन सी, फायबर, झिंक आणि फोलेटची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. सोबतच कारले तुमचे वजन कमी करत तुमची इम्युनिटीही बूस्ट करते.

कारल्याचे हे पाच फायदे वाचून तुम्हीही अवाक व्हाल

१. फायबर रिच डाएट

कारल्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे तुमचे डाएट संतुलित राहाते आणि पोटासंबंधित आजारही बरे होतात. कारले खाल्ल्याने बऱ्याच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे तुमचं वजनही नियंत्रणात राहाण्यास मदत होते.

२. लो कॅलरी फूड

तुमचं वजन आणि तुम्ही दिवसभऱ्यात किती कॅलरी गेन करता याचा एकमेकांशी निश्चितच संबंध असतो. कॅलरीची मात्रा जेवढी कमी तेवढं तुमचं वजन नियंत्रणात राहाण्यास मदत होते. कारल्यामध्ये कार्बोहायड्रेट कमी प्रमाणात असते. ज्यामुळे तुमची चर्बी कमी होण्यास मदत होते.

३. विटॅमिन सी रिच सोर्स

कारला हा विटॅमिन सी चा चांगला सोर्स आहे. ते तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात. तसेच कारला शरीरातील एक्स्ट्रा फॅट बाहेर काढते. तसेच तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढवते.

Weight Loss Tips
Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

अशा पद्धतीने खा कारले

तुम्ही कारल्याचा ज्यूस काढून प्या. जर त्याचा कडूपणा कमी करायचा असेल त्यात तुम्ही लिंबाचा रस घालू शकता. जर तुम्ही रोज याचे सेवन कराल तर तुमचं वजन कमी होईल. तसेच कारले तेलात शिजवून खाणे टाळा. असे केल्यास तुमचे वजन कमी होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.