Weight Gain : वेळी अवेळी खाण्याचा आपल्या वजनावर काही फरक पडतो का?

शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक त्यांना या जंकफूडमधून मिळत नाहीत
Weight Gain
Weight Gain esakal
Updated on

Weight Gain :

आपल्या रोजच्या लाइफस्टाइलचा आपल्या प्रकृतीवर परिणाम होतो. आपले वजन वाढणे किंवा कमी होणे, आपल्याला एखादा आजार होणे यासाठी आपली रोजची लाइफस्टाईल जबाबदार आहे. कामामुळे तुमच्या रोजच्या आहाराकडे दुर्लक्ष होत असेल तर त्याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो.

एनसीबीआयमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, जे लोक नियमितपणे अन्न खातात त्यांचे आरोग्य चांगले असते आणि त्यांना लठ्ठपणाची समस्या नसते. याउलट, जे लोक अनियमितपणे खातात, विशेषत: रात्रीच्या उशीरा शिफ्टमुळे ते रात्री उशिरा जेवतात. अशा लोकांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो.

Weight Gain
Weight Gain After Marriage : दररोज सेक्स केल्यानं खरंच वजन वाढतं का?

इतकंच नाही तर ज्यांना खाण्याची ठराविक वेळ नसते, त्यांना लठ्ठपणा आणि आरोग्याशी संबंधित इतर समस्यांचा सामना करावा लागतो. ज्या लोकांची खाण्याची वेळ निश्चित नसते आणि त्यांच्या खाण्याच्या सवयींमध्ये सातत्य नसते अशा लोकांची पचनसंस्थाही सुरळीत काम करत नाही. (Weight Gain)

Weight Gain
गरजेपेक्षा जास्त Protine शरीरासाठी ठरू शकतं हानिकारक, Weight Gain पासून कॅन्सर पर्यंतचा धोका

पोषक तत्वांची कमतरता

ज्या लोकांना वेळेवर जेवायला मिळत नाही. अशा लोकांना आपली भूक भागवण्यासाठी अनहेल्दी पदार्थ, स्नॅक्स आणि जंक फूड खाऊ लागतात. ज्यामुळे पोषक तत्वांची कमी त्यांना भासू लागते. कारण, शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक त्यांना या जंकफूडमधून मिळत नाहीत. 

पचनाच्या समस्या

अनेकांना पचनाच्या समस्या उद्भवू लागतात अनियमित खाल्ल्याने अनेकांना पचनाच्या समस्या उद्भवू लागतात. वास्तविक, जेव्हा तुम्ही योग्य वेळी सकस आहार पाळत नाही, तेव्हा त्याचा पचनक्रियेवर परिणाम होतो.

Weight Gain
For For Weight Gain : वजन वाढण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; हिवाळ्यात हा पदार्थ खा अन् वजन वाढवा

बद्धकोष्ठतेचा त्रास होतो

लोक अनेकदा बद्धकोष्ठतेची तक्रार करताना दिसतात जे लोक अनियमितपणे खातात किंवा अनेकदा जेवण टाळतात, असे लोक काही काळानंतर खाण्याच्या विकाराचे शिकार होतात. असे घडते कारण वेळेवर अन्न न खाल्ल्याने अनेकदा भूक लागते.

Weight Gain
Weight Gain Facts : सडपातळ असलेल्या मुलींचं वजन लग्नानंतर का वाढतं? ही आहेत खरी कारणं

वजन वाढते

काही काळानंतर असे लोक स्नॅक्स, चिप्स यांसारख्या वस्तू आपल्यासोबत ठेवू लागतात आणि गरज नसताना अशा गोष्टींचे सेवन करतात, ज्यामुळे वजनही वाढते. मात्र, काहीवेळा अशा लोकांना अनारोग्यकारक गोष्टी खाल्ल्याने अपराधीही वाटू लागते. (Weight Gain)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.