Weight Gain Tips: वजन वाढवायचे असेल तर 'चिया सीड्स'चा आहारात या पद्धतीने समावेश करू शकता, लगेच जाणवेल फरक

Weight Gain Tips: तुम्ही वजन वाढण्यासाठी खुप प्रयत्न करत आहात पण वाढत नसेल तर पुढील प्रमाणे चिया सीड्चे सेवन करू शकता.
Weight Gain Tips:
Weight Gain Tips: Sakal
Updated on

Weight Gain Tips: ज्याप्रमाणे वजन कमी करणे अवघड असते त्याचप्रमाणे वजन वाढवणे देखील लोकांसाठी अवघड असते. अनेक लोक वजन वाढवण्यासाठी विविध उपाय करतात पण रिझल्ट मिळत नाही. वजन वाढवण्यासाठी तुम्ही चिया सिड्सचा आहारात समावेश करू शकता. चिया सिड्समध्ये प्रोटीन, फायबर सारखे अनेक पोषक घटक असतात. जे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.आहारात चिया सीड्सचा कसा समावेश करावा हे जाणून घेऊया.

दह्यात मिक्स करा

दह्यामध्ये चियासीड्स मिक्स करून खाऊ शकता. यामुळे वजन वाढण्यास मदत मिळते. तुम्हाला वजन वाढवणायचे असेल तर या सीड्सचे सेवन करू शकता. या सीड्समध्ये फायबरचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. तुम्ही दररोज सकाळी नाश्त्यात किंवा स्नॅक्स म्हणून याचे सेवन करू शकता.

ब्रेड आणि चिया बियांचा वापर

ब्रेड किंवा मफिनच्या पिठात चिया बिया घालू शकता. यामुळे तुमचा बेक केलेला पदार्थ आणखी हेल्दी होईल. ब्रेडमध्ये भरपूर फायबर असते. कारण ती संपूर्ण गव्हाच्या पिठापासून बनविली जाते. तसेच तपकिरी ब्रेड जीवनसत्त्वे आणि व्हिटॅमिन बी, लोह, मॅग्नेशियम आणि जस्त सारख्या खनिजांचा एक चांगला स्रोत आहे. याच्या सेवनाने तुम्ही तुमचे वजन वाढवू शकता.

स्मूदीमध्ये मिक्स करा

जर तुम्ही देखील शारीरिकदृष्ट्या कमकुवत असाल तर तुमचे वजन वाढवण्यासाठी तुम्ही चिया बियां सीड्सोबत स्मूदी खाऊ शकता. स्मूदीमध्ये प्रोटीन पावडर, स्पिरुलिना किंवा इतर पावडर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. याचे सेवन करण्यासाठी सर्वात आधी एक ग्लास दूध घ्या. नंतर काजू आणि अंजीर घाला. ते चांगले मिक्सरमध्ये बारीक करा आणि नंतर चिया बिया घालून सेवन करा.

Weight Gain Tips:
Lemongrass Tea: 'या' चहाचे नियमितपणे सेवन केल्यास वजन राहू शकते नियंत्रणात

गुलकंद आणि चिया सीड्स

तुम्ही वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तर गुलकंदासोबत चिया सीड्सचे सेवन करू शकता. गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला गुलकंद पचन सुलभ करते. चिया बियांमध्ये फायबर, प्रथिने आणि ओमेगा -3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते. गुलकंद आणि चिया सीड्स एकत्र खाल्ल्याने वजन वाढण्यास मदत होते. यासाठी एक ग्लास दूधामध्ये गुलकंद आणि चिया बिया मिसळून तुम्ही याचे सेवन करू शकता.

सॅलड आणि चिया बियांचे सेवन

सॅलड खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. जर तुम्हाला तुमचे वजन वाढवायचे असेल तर तुम्ही सॅलडसोबत चिया बियांचे सेवन देखील करू शकता. यासाठी 2 चमचे चिया बिया भिजवून त्यात टाका.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.