वजन कमी करण्यासाठी आजकाल अनेकजण प्रयत्न करत आहेत. कारण, चुकीची लाइफस्टाईल, चुकीच्या पद्धतीने घेतलेली झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे आजकाल लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. लठ्ठपणा केवळ सामान्य लोकांना त्रास देतोय असे नाही. तर, मोठ्या सेलिब्रेटींनाही वाढलेलं वजन कमी करण्यासाठी जीममध्ये तासंतास मेहनत करावी लागत आहे. (Weight Loss Tips)