Weight Loss Diet : मसालेदार चहा प्या अन् महिन्यात वजन कमी करा, पाच मिनिटात तयार होतो, पहा रेसिपी

हर्बल टी अगदी पाच मिनिटात तयार होतो, पहा रेसिपी
Weight Loss Diet
Weight Loss Dietesakal
Updated on

Weight Loss Diet :

आजच्या काळात, बाहेरून आलेले जास्त तळलेले, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने आणि शारीरिक स्थैर्य नसल्यामुळे वजन वाढण्याच्या समस्येने बहुतेक लोक त्रस्त आहेत. सुटलेल्या पोटाची केवळ लाजच वाटत नाही, तर ते अनेक आजारही घेऊन येते. त्याच वेळी, एखाद्या व्यक्तीचे वजन जितक्या वेगाने वाढते तितके कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात.

वजन कमी करण्यासाठी बहुतेक लोक डायटचे पालन करतात. बरेच तास जिममध्ये घाम गाळतात. कधीकधी असे केल्याने देखील चांगले परिणाम मिळत नाहीत. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही तासंतास व्यायाम आणि डाएटिंग करूनही तुमचे वजन कमी होत नसेल तर, मसालेदार चहा पिऊन तुमचे वजन कमी होऊ शकते.

Weight Loss Diet
Weight Loss Tips : शरीरातली चरबी वितळतेय की नाही? शरीरच देतं हे सिग्नल

स्पेशल मसालेदार चहाचे रिकाम्या पोटी नियमित सेवन केल्याने तुमचे वजन लवकर कमी होऊ शकते. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हा खास चहा बनवण्यासाठी तुम्हाला फक्त 2 चिमूट हळद, 2 चिमूट काळी मिरी पावडर आणि एक ग्लास पाणी लागेल.

काळी मिरीचा फायदा कसा होतो?

NCBI म्हणजेच नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या अहवालानुसार, काळी मिरीमध्ये पाइपरिन नावाचे एक रसायन आढळते, जे चयापचय वाढवून कॅलरी अधिक बर्न करण्यास मदत करते. याशिवाय शरीरात चरबी वाढवणाऱ्या पेशींची निर्मिती रोखण्यातही हे उपयुक्त आहे. अशा परिस्थितीत त्याचे सेवन केल्याने वजन वाढण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात येते.

Weight Loss Diet
Early Weight Loss साठी ‘या’ भाज्यांचा ज्यूस ठरेल फायदेशीर, आजच डाएटमध्ये सामिल करा हेल्दी Vegetable Juice

हळद कशी फायदेशीर आहे?

हळदीबद्दल बोलायचे झाले तर त्यात असलेले पॉलीफेनॉल आणि कर्क्युमिन संयुगे पचनसंस्थेतील सूज वाढवण्यासाठी देखील प्रभावी आहेत. याशिवाय यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी तत्व देखील शरीरातील चरबी वाढण्यापासून रोखतात.

विशेषत: रिकाम्या पोटी हळदीचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होण्यास मदत होते. अशा परिस्थितीत, हळद जलद वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते.

हर्बल टी कसा बनवायचा?

सर्वप्रथम एका पातेल्यात एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा.पाणी खूप गरम झाल्यावर त्यात २ चिमूट हळद टाकून उकळा.पाणी उकळल्यानंतर आता त्यात काळी मिरी टाका. काळीमिरी घालून ५ ते ७ मिनिटे मंद आचेवर शिजवा. थोड्या वेळेनंतर गॅस बंद करा. अशा प्रकारे तुमचा हर्बल चहा तयार होईल. ते थोडे थंड झाल्यावर रिकाम्या पोटी प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.