Heart Disease : वजन कमी करणारे औषध घेतल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो? संशोधनातून झाला खुलासा

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या सायंटिफिक सेशनमध्ये हे क्लिनिकल संशोधन सादर करण्यात आले आहे.
Heart Disease
Heart Diseaseesakal
Updated on

Heart Disease : मागील काही वर्षांपासून जगभरात लठ्ठपणाची समस्या वाढली आहे. अनेक वयोगटांमधील लोकांमध्ये लठ्ठपणा वाढत चालला आहे. यामध्ये लहान मुले, किशोरवयीन मुले-मुली, तरूणाई, प्रौढ महिला आणि पुरूष अशा सर्वच वयोगटांमध्ये लठ्ठपणा वाढला आहे.

त्यामुळे, झपाट्याने वाढत चाललेला हा लठ्ठपणा आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. हा वाढलेला लठ्ठपणा अनेक आजारांचे मूळ बनत असून लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व जण त्याला बळी पडत आहेत. यामागील प्रमुख कारण म्हणजे, बिघडलेली जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी.

परंतु, हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता देखील निर्माण होत आहे. वजन कमी करण्यासाठी लोक व्यायाम, आहारावर लक्ष केंद्रित करत आहेत. वजन कमी करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक प्रकारची औषधे देखील उपलब्ध आहेत.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका आंतरराष्ट्रीय क्लिनिकल रिसर्चमध्ये असे म्हटले आहे की, वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असणारे एक औषध हृदयविकाराचा धोका कमी करण्यात यशस्वी ठरू शकते.

Heart Disease
Weightloss Without Diet : डायटिंग न करता वजन कमी करायचे आहे ? मग,‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो

काय सांगतो रिसर्च ?

या संदर्भात नुकतेच आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, वजन कमी करण्यासाठी वापरले जाणारे 'वेगोवी' हे औषध हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक्सचा धोका हा २० टक्क्यांनी कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते.

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या सायंटिफिक सेशनमध्ये हे क्लिनिकल संशोधन सादर करण्यात आले आहे. या संशोधनामध्ये 40 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या आणि लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या सुमारे १७ हजार लोकांची चाचणी घेण्यात आली.

या सर्व लोकांना आधीपासूनच हृदयाशी संबंधित समस्या होत्या. या लोकांना हे वजन कमी करण्याचे औषध देण्यात आले. हे औषध दिल्यानंतर त्या लोकांचा लठ्ठपणा कमी झाला. शिवाय, हृदयाशी संबंधित आजारांचा धोका ही कमी झाला.

वजन कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या वेगोवी औषधामध्ये सेमाग्लूटाईड घटक आढळून येतो. हा घटक हृदयाशी संबंधित गुंतागुंत कमी करण्यासाठी उपयुक्त ठरला आहे. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असणारे हे औषध आता हृदयविकारासाठी देखील फायदेशीर ठरू शकते.

Heart Disease
Meditation For IQ : मेडिटेशन केल्याने फोकस आणि IQ देखील वाढू शकतो? संशोधनात करण्यात आला दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.