Weight Loss Mistakes : Weight Loss दरम्यान करू नका या चूका, वजन कमी होणार नाहीच, पण...

या चूका करत वजन कमी करणं केवळ अशक्य
Weight Loss Mistakes
Weight Loss Mistakes esakal
Updated on

Weight Loss Mistakes : वाढतं वजन कमी करणं म्हणजे प्रत्येकासाठी मोठा टास्कच असतो. डाएट, वर्कआउट प्लॅन नेमका कोणता फॉलो करायचा हा देखील मोठा प्रश्नच असतो.

पण बऱ्याचदा तुम्ही वजन घटवण्याचा प्रयत्न करत असताना काही दिवसांनी वजन आणखीनच वाढत जातं. वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेणं गरजेचं आहे.

वजन कमी करण्याचे काही मार्ग देखील आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. म्हणून वजन कमी करण्यासाठी आपण जी काही पद्धत अवलंबत आहात ती निरोगी आणि सुरक्षित आहे याची खात्री करणे नेहमीच महत्वाचे आहे.

या लेखात, आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना सामान्यत: लोक करत असलेल्या काही चुकांबद्दल आज आपण माहिती घेऊयात.(Weight Loss)

Weight Loss Mistakes
Weight Loss Spice : चरबी मेणासारखी वितळवायलाच निर्माण झालाय किचनमधील हा पदार्थ; खा आणि बारीक व्हा!

उपाशी राहणे

वजन कमी करण्याची गरज जाणवताच लोक खाणे-पिणे पूर्णपणे थांबवतात. ते कमी प्रमाणात खाऊ लागतात किंवा पूर्णपणे उपाशी राहू लागतात.

परंतु, हा अत्यंत हानिकारक मार्ग आहे. भूक लागल्यावर उपाशी राहणे शक्य नसते. याशिवाय अशा प्रकारे वजन कमी केल्यानंतर असेही होऊ शकते की काही काळानंतर तुमची भूक आणि वजन दोन्ही वेगाने आणि मोठ्या प्रमाणात वाढते.

दररोज व्यायाम न करणे

अनेकदा आळस किंवा थकव्यामुळे लोक व्यायाम करत नाहीत किंवा जिममध्ये जात नाहीत, परंतु याचा परिणाम त्यांच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेवर होतो.

खरं तर, शारीरिक श्रमाच्या प्रक्रियेत वारंवार ब्रेक घेतल्याने चयापचयावर देखील परिणाम होतो आणि लोकांचे वजन कमी होत नाही.

Weight Loss Mistakes
Weight Loss Drink: 'हे' पाणी पिलात तर झटपट लठ्ठपणा कमी होईल

जास्त व्यायाम करना

काही लोकांना असे वाटते की आपण जितके जास्त व्यायाम कराल किंवा जितके जास्त वेळ व्यायाम कराल तितक्या वेगाने आपले वजन कमी होईल. पण, तसे होणार नाही.

तज्ज्ञांच्या मते जास्त व्यायाम केल्याने वजन कमी होत नाही. यामुळे स्नायूंचे नुकसान होते आणि शरीराला दुरुस्तीसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे वर्कआऊटनंतर पुरेशी विश्रांती घेणंही गरजेचं आहे.

एनर्जी ड्रिंक लिहणे

वजन कमी करण्याच्या आहारासोबत अनेकजण एनर्जी ड्रिंक्स पितात. बहुतेक एनर्जी ड्रिंक्समध्ये भरपूर साखर वापरली जाते. त्यात कॅलरीजही भरपूर असतात. त्याऐवजी, तुम्ही फळं खाऊ शकता. 

Weight Loss Mistakes
Weight Loss : सुटलेल्या पोटाची लाज वाटतेय? वजन कमी करायचं आहे? आजच करा या टिप्स फॉलो...

झोप न घेणे

वजन कमी करण्यासाठी शरीराला विश्रांती देणे देखील खूप महत्वाचे आहे. रात्रीची ७-८ तासांची झोप तुम्हाला दुसऱ्या दिवशी नवीन उर्जेने काम करण्यास मदत करेल. तुम्ही तुमच्या शरीराला जितकी कमी विश्रांती द्याल तितके वजन वाढेल. कारण कमी झोप किंवा विश्रांती तुमच्या शरीरात हार्मोनल असंतुलन निर्माण करते. त्यामुळेच वर्कआऊट केल्यानंतर किमान अर्धा तास शरीराला विश्रांती देणे अत्यंत आवश्यक आहे.

टेंन्शन घेऊ नका

ताणतणावापासून दूर राहा.सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये सर्वांनाच ताणतणावाचा सामना करावा लागतो. यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जेव्हा तुम्ही तणावात असता, तेव्हा तुमच्या शरीरात कोर्टिसोल नावाचं हार्मोन स्रावित होतं. यामुळे चयापचय क्रिया मंद होते यामुळे वजन कमी करण्यात अडथळे येऊ शकतात.

व्यसन करणे

सकाळी व्यायाम करून रात्री ड्रिंक करणारे लोकही या जगात आहेत. वजन कमी करायचं असेल तर दारुचं सेवन टाळा. दारुमध्ये अनेक कॅलरीज असतात. यापासून तुम्हाला उर्जा मिळत नाही पण शरीरातील कॅलरीज मात्र वाढतात. यामुळे तुमचं वजन वाढतं. त्यासाठी वजन की करायचं असेल तर दारुचं सेवन करणं टाळा.

Weight Loss Mistakes
Rice For Weight Loss : भात खाल्ल्यानं वजन वाढतंय? तज्ज्ञांनी सांगितली भात शिजवण्याची योग्य पद्धत!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.