Weight Loss Recipe
Weight Loss Recipeesakal

Weight Loss Recipe : स्मूदी, शेक विसरा अन् हा ज्यूस प्या, झटक्यात बनतो अन् फटक्यात वजन कमी करतो

हा ज्यूस अनेक गंभीर आजारांपासून तुमचे रक्षण करतो
Published on

Weight Loss Recipe :

लोक वजन कमी करण्यासाठी भरपूर लिक्विड आणि स्मूदीचा वापर करतात. कारण त्यामध्ये कॅलरीज कमी असतात पण भरपूर फायब असते. काहींना फळांचा रस प्यायला आवडतो, तर काहींना भाज्यांचा रस. कारण दोघांचे स्वतःचे वेगळे फायदे आहेत.

फळांच्या रसात भरपूर गोडवा असतो, त्यामुळेच अनेकजण फळांच्या रसापेक्षा भाज्यांचा रस पिणे पसंत करतात. जर तुम्हीही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल. भाज्यांचा रस पिण्यास प्राधान्य देत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की टोमॅटो, गाजर आणि आल्याचा रस तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.

Weight Loss Recipe
Weight Loss Tips : शरीरातली चरबी वितळतेय की नाही? शरीरच देतं हे सिग्नल

जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात सकाळी रिकाम्या पोटी या रसाने करत असाल तर ते तुमचे वजन झपाट्याने कमी करण्यात मदत करू शकते.

जे लोक वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी टोमॅटो, गाजर आणि आल्याचा रस घरी कसा बनवायचा? त्याचे फायदे काय काय होतील हेही पाहुयात.

वजन कमी करण्यासाठी टोमॅटो, गाजर आणि आल्याचा रस पिण्याचे फायदे

या ज्यूसची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यात कॅलरीज खूप कमी असतात. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि चयापचय वाढते. हे आपल्याला अन्नाचे चांगले पचन करण्यास आणि अतिरिक्त कॅलरी जलद बर्न करण्यास मदत करते.

Weight Loss Recipe
Weight Loss Diet : मसालेदार चहा प्या अन् महिन्यात वजन कमी करा, पाच मिनिटात तयार होतो, पहा रेसिपी

जे सकाळी वर्कआउट करतात त्यांच्यासाठी हे वर्कआऊटपूर्वीचे सर्वोत्तम पेय ठरू शकते, कारण याचे सेवन केल्याने शरीराला जलद ऊर्जा मिळते आणि वर्कआउट करताना थकवा जाणवत नाही. याशिवाय, भरपूर प्रमाणात पोषक असल्याने ते शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यास देखील मदत करते.

या ज्यूसचे अधिक फायदे

याशिवाय, शरीरात साचलेली घाण काढून टाकणे, डिटॉक्सिफाय करणे आणि हायड्रेटेड ठेवण्यास देखील मदत करते. हा रस प्यायल्यानंतर खूप वेळ भूक लागत नाही.

शरीरातील रक्तप्रवाह वाढतो

रक्तदाब नियंत्रणात राहतो

त्यात व्हिटॅमिन सी, ए, पोटॅशियम, अँटिऑक्सिडंट्स, लायकोपीन यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांचा समावेश आहे.

पोटाशी संबंधित समस्या जसे गॅस, पोट फुगणे, अपचन आणि बद्धकोष्ठता इत्यादीपासून आराम मिळतो.

अनेक गंभीर आजारांपासून तुमचे रक्षण करते

तसेच उच्च कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.


Weight Loss Recipe
Weight Loss Mistakes: वजन कमी करताना अजिबात करु नका या चुका, वजन तर कमी होणार नाहीच, पण...

टोमॅटो गाजर आणि आल्याचा रस कसा बनवायचा

साहित्य - 2 गाजर, 2 टोमॅटो, १ छोटा तुकडा आले, कोथिंबीरीची पाने, अर्ध्या लिंबाचा रस

कृती - हे सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याचा ज्यूस करून घ्या. आणि सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.