Weight Loss Tips : सुटलेल्या ढेरीची काळजी असेल तर सायंकाळच्यावेळी या गोष्टी करणं बंद करा!

How to reduce belly fat: सांयंकाळच्यावेळी या गोष्टी करणे टाळा, वजन कमी झालं नाही तर सांगा
Weight Loss Tips
Weight Loss Tipsesakal
Updated on

Weight Loss Tips : प्रमाणापेक्षा वजन वाढलं आहे किंवा दिवसेंदिवस मी लठ्ठ होत आहे हे वाक्य तुम्ही कित्येक लोकांच्या तोंडून ऐकलं असेल. वाढलेलं वजन कमी करणं म्हणजे बहुतांश लोकांसाठी ही मोठी समस्या असते. डाएट कोणतं फॉलो करावं, वर्कआउट काय करावं असे असंख्य प्रश्न अनेकांच्या मनात असतात.

मग अशावेळी तुम्ही वजन कमी करण्यासाठी विविध मार्ग निवडता. वजन कमी करत असताना एक समस्या सतत भेडसावते ती म्हणजे पोटाची चरबी. पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी प्रचंड घाम गाळावा लागतो.

Weight Loss Tips
Good Fats: सर्वच फॅट्स शरीरासाठी धोकादायक नाहीत... या फॅट्समुळे शरीराला होवू शकतात फायदे

वाढलेल्या वजनामुळे काय होऊ शकतं?

वजन कमी होण्यासाठी तसंच वाढलेल्या वजनामुळे अन्य गंभीर आजारांची लागण होऊ नये, यासाठी लोक कित्येक प्रयत्न करत असतात. अतिरिक्त वजनामुळे टाइप २ मधुमेह आणि कॅन्सर सारख्या घातक आजारांची लागण होण्याचा धोका अधिक असतो. तसेच, फॅटी लिव्हर, ब्लड प्रेशर वाढणे अशा आजरांना सुरूवात होते.

संध्याकाळच्या वेळी लोक अनेकदा अशा पदार्थांचे सेवन करतात, ज्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या सुरू होतात. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही कोणत्या 5 गोष्टींपासून दूर राहावे.

दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाच्या दरम्यान, अशी वेळ असते जेव्हा लोक अशा अनेक चुका करतात, ज्यामुळे आरोग्य बिघडू शकते. संध्याकाळी ५ ते ७ ची वेळ अशी असते की, भूक लागते पण त्या वेळी पूर्ण जेवल्यासारखं वाटत नाही. अशा वेळी लोक अशा काही गोष्टींचे सेवन करतात, ज्यामुळे शरीरात रोग येतात.

येथे आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या संध्याकाळच्या वेळी पूर्णपणे बंद केल्या पाहिजेत. या गोष्टींमुळे वजन तर वाढतेच शिवाय अनेक आजार होण्याची भीती असते.

Weight Loss Tips
Yoga For Belly Fat : पोटाची चरबी झटक्यात वितळेल, रोज करा हे 3 योगा, मिळेल जबरदस्त फायदे

स्नॅकमध्ये तेलकट पदार्थ खाऊ नका

संध्याकाळी तेलकट आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे. जर तुम्हाला संध्याकाळी समोसे आणि चाट आवडत असतील तर हे देखील जाणून घ्या की ते खाल्ल्यानंतर तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी देखील वाढू शकते.

प्रक्रिया केलेले अन्न

जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न देखील संध्याकाळी खाऊ नये. जर तुम्हाला प्रोसेस्ड फूड खायला आवडत असेल तर ते लगेच बंद करा. प्रक्रिया केलेल्या अन्नामुळे पोटाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

Weight Loss Tips
Fruits For Weight Loss: जीममध्ये न जाताच 'ही' फळं खाल्ल्याने Belly Fat होईल कमी

सायंकाळीचे ड्रिंक करणे बंद करा

संध्याकाळी दारूचे सेवन टाळावे. दारूच्या सेवनाने तुमची रात्रीची झोप खराब होईल आणि शरीराच्या अंतर्गत अवयवांवरही त्याचा परिणाम होईल. संध्याकाळी चीज खाणे देखील टाळावे. त्यात सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅट जास्त असते, ज्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि उच्च रक्तदाब होऊ शकतो.

सायंकाळी गोड खाऊ नका

मिठाईचे शौकीन असाल तर संध्याकाळी मिठाई खाणे बंद करा. आईस्क्रीम, मिठाई यांसारख्या गोष्टींमध्ये भरपूर साखर असते, ज्यामुळे अनेक आजार होतात. अशा परिस्थितीत निरोगी राहण्यासाठी गोड पदार्थांपासून दूर राहायला हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.