How to lose belly fat : बेली फॅट कमी करायचंय? मग नियमित करा हे ४ व्यायाम

दैनंदिन जीवनामध्ये जर आपण साधेसोप व्यायाम प्रकारांचा नियमित सराव केला तर यामुळे नक्कीच तुमच्या आरोग्यास बरेच फायदे मिळतील. आपल्यालाही फ्लॅट अॅब्स हवे आहेत ? तर मग हा लेख पूर्ण वाचावा.
Belly Fat Loss
Belly Fat LossSakal
Updated on

Health Care Tips ‘तू एवढी कशी फिट आहेस गं, मला पण वजन कमी करण्यासाठी उपाय सांग ना’ हे वाक्य बरेच जण एखाद्या सडपातळ महिलेला किंवा तरूणीला पाहिल्यानंतर हमखास म्हणतातच. पण शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करणे म्हणावे तितके कठीण नाही. काही साधेसोपे एक्सरसाईज आणि स्वतःला दिलेली सहा मिनिटे तुमचा कायापालट करण्यास मदत करू शकतात.

Belly Fat Loss
वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा या गोष्टी

पण यासाठी शिस्त आणि ध्येयावर लक्ष केंद्रित अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्ही देखील वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेत आहात का? तर मग या लेखातील माहिती तुमच्याकरिता महत्त्वाची आहे. या लेखाद्वारे आपण चार साध्यासोप्या एक्सरसाईजची माहिती जाणून घेणार आहोत. हे व्यायाम प्रकार आपण जिम किंवा घरच्या घरी देखील केल्यास बेली फॅट कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Belly Fat Loss
Belly Fat : बेली फॅट झटक्यात वितळवेल ही एक्सरसाइज, फक्त ११ मिनिटांत बर्न करते 100 कॅलरीज

वजन कमी करायचे असेल तर मग कंटाळा करून चालणार नाही, यासाठी आपल्याला दिवसातील काही मिनिटे स्वतःसाठी काढावी लागणार. समजा तुम्हाला अगदीच वेळ काढणे शक्य होत नसेल तर किमान एका-एका व्यायाम प्रकारचे तीन सेट १५ ते २० सेकंदांसाठी करावे. दोन सेट्समध्ये किमान ३० सेकंद ते एक मिनिटांसाठी विश्रांती घ्यावी.

चला तर मग व्यायाम प्रकार व हे व्यायाम प्रकार कसे करायचे याची माहिती जाणून घेऊया सविस्तर...

Belly Fat Loss
बेली फॅट ,Lower Fat बर्न करण्यासाठी वापरा मसाल्यातील 'हे' पदार्थ

माऊंट क्लायम्बर (Mountain climber)

पुशअप पोझिशनमध्ये यावे. तुमचे हात खांद्यांच्या रेषेत जमिनीला समांतर असतील, याची काळजी घ्यावी. पोझिशन सेट झाल्यानंतर उजव्या पायाचा गुडघा आपल्या छातीजवळ आणावा, ही क्रिया करताना कमरेचा भाग खालील बाजूस झुकता कामा नये. यानंतर उजवा गुडघा पुन्हा मागे घेऊन जात डावा गुडघा छातीजवळ आणावा. एकूणच तुम्हाला प्लँक पोझिशनमध्ये लयबद्ध पद्धतीने धावण्याची क्रिया करायची आहे.

Belly Fat Loss
Detox Drink : रात्रभर पाण्यात भिजवलेले हे पदार्थ शरीर करतील डिटॉक्स, Weigh Loss साठी जालीम उपाय!

शरीराच्या क्षमतेनुसार धावण्याचा वेग वाढवावा. जमिनीवर पुशअप पोझिशनमध्ये राहणे कठीण जात असल्यास आपण सोफा किंवा टेबलच्या मदतीने हा व्यायाम करू शकता. व्यायाम करताना शरीराची ठेवण मात्र योग्य असणे आवश्यक आहे. माऊंट क्लायम्बर एक्सरसाईजमुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते.

Belly Fat Loss
Mulberry Fruit Health Benefits : फॅटी लिव्हर, weigh loss सगळ्यावर गुणकारी आहे हे छोट फळ;एकदा खाऊन तर बघा!

प्लँक (Plank)

पुशअप पोझिशनमध्ये या, आपले हात खांद्याच्या रेषेत सरळ ठेवा. शरीराची हालचाल अधिक न करता ते स्थिर ठेवावे. तुमचे डोके मणक्याच्या रेषेत असणे आवश्यक आहे. यानंतर जमिनीवर एखाद्या स्पॉटवर लक्ष केंद्रित करा. सुरुवातीस कमीत कमी ३० सेकंदांसाठी प्लँक पोझिशनमध्ये स्थिर राहा. यानंतर नियमित व्यायामाचा सराव करून प्लँक होल्ड करण्याचा वेळ वाढवावा. प्लँकमुळे बेली फॅट कमी होण्यास मदत मिळतेच शिवाय चयापचयाची क्षमताही सुधारते.

Belly Fat Loss
Weigh Loss Breakfast : वजन कमी करण्यासाठी झटपट बनवा सोया पोहे

रीव्हर्स क्रंचेस (Reverse crunches)

योग मॅटवर आपल्या पाठीवर झोपावे. चेहरा आकाशाच्या दिशेनं ठेवावा, हात शरीराच्या बाजूला ठेवावेत. पाय गुडघ्यांमध्ये न दुमडता सरळ ठेवा आणि ९० अंश डिग्रीमध्ये दोन्ही पाय एकत्र वरील बाजूस उचला. यानंतर पाय आपल्या कपाळाजवळ आणा, ही क्रिया करताना श्वास हळूहळू बाहेर सोडा.

Belly Fat Loss
Walking For Belly Fat : पोटाची चरबी कमी करण्यासाठी चालण्याचा खरंच फायदा होतो का? तज्ज्ञ सांगतात...

श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुरू ठेवत पुन्हा मूळ स्थितीत यावे. म्हणजेच तुमचे पाय पुन्हा ९० अंश डिग्रीमध्ये आणावेत, पाय जमिनीवर ठेवू नये.  एक सेट झाल्यानंतर आपल्या क्षमतेनुसार रीव्हर्स क्रंचेस एक्सरसाईज पुन्हा करावा. या व्यायामामुळे फ्लॅट अॅब्स तयार होण्यास मदत मिळू शकते.

Belly Fat Loss
Belly Fat Loss: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा ही 4 सोपी योगासने

स्क्वॅट्स (Squats)

एक्सरसाईज रूटिनमधील सिट-अप्स हा महत्त्वपूर्ण व्यायाम प्रकार आहे. जर आपण शरीराचे वजन कमी करण्याबाबत गंभीर असाल तर नियमित सिट-अप्स करण्यास सुरुवात करावी. स्क्वॅट्समुळे शरीरातील जास्तीत जास्त कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळते. महत्त्वाचे म्हणजे हा व्यायाम प्रकार करताना कोणत्याही साधनांची आवश्यकता भासत नाही.

Belly Fat Loss
Weight Loss: वजन कमी करायचंय? मग फ्रिजमधील थंड पाणी पिणे टाळा, नाहीतर...

केवळ दोन पायांमध्ये काही अंतर ठेवून उभे राहा आणि लयबद्ध पद्धतीने शरीर पुढील बाजूस झुकू न देता पाय गुडघ्यात मोडून खाली बसावे व वर उठावे. तुमचे गुडघे जमिनीस समांतर असतील, याची काळजी घ्यावी. आपण खुर्चीच्या मदतीनेही स्क्वॅट्स करू शकता.

Belly Fat Loss
Fruits For Weight Loss: जीममध्ये न जाताच 'ही' फळं खाल्ल्याने Belly Fat होईल कमी

आरोग्य निरोगी राहावे यासाठी व्यायामासह हेल्दी डाएट प्लान देखील फॉलो करावा. ज्यामुळे बेली फॅट कमी होण्यास लवकरात लवकर मदत होईल. योग्य प्रमाणात व योग्य वेळेस अन्नपदार्थांचे सेवन केल्यास शरीरास अनेक महत्त्वपूर्ण फायदे मिळतात, असा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून वारंवार दिला जातो. तर मित्रांनो आपल्या वर्कआऊट रूटीनमध्ये या व्यायामांचा समावेश करून वाढलेले वजन कमी करण्याची तयार करा.

Belly Fat Loss
Yoga For Belly Fat : पोटाची चरबी झटक्यात वितळेल, रोज करा हे 3 योगा, मिळेल जबरदस्त फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.