Wheat Pasta: गव्हापासून बनवलेला पास्ता खाऊन वजन नियंत्रणात ठेऊ शकता

Wheat Pasta: मैदापासून बनवलेला पास्ता खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. पण तुम्ही गव्हापासून बनवलेला पास्ता खाऊ शकता.
Wheat Pasta Benefits
Wheat Pasta BenefitsSakal
Updated on

Wheat Pasta Health Benefits: अनेक लोकांना पास्ता खायला आवडतो. पास्ता हा इटालियन डिश असून खायला चवदार लागतो. आजकाल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने पास्ता खातात. पण पास्ता हा जंक फूड म्हणून ओळखला जातो. पास्ता मैदा पासून बनवलेला असतो. यामुळे अनेक लोक पास्ता खाणे टाळातात. पण तुम्ही गव्हाच्या पीठापासून बनवलेला पास्ता खाऊ शकता. यामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे सर्व वयोगतील लोकांसाठी फायदेशीर असतात.

फायबर

गव्हापासून बनवलेल्या पास्तामध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. फायबरमुळे पोट भरलेले राहते, ज्यामुळे भूक जास्त लागत नाही.

पोषक घटक

गव्हाच्या पास्तामध्ये व्हिटॅमिन बी, लोह, मॅग्नेशिअम आणि झिंक यासारखे पोषक घटक असतात. हे घटक शरीराला निरोगी ठेवण्यास आणि पचन सुरळित ठेवण्यास मदत करतात.

वजन नियंत्रणात

गव्हाच्या पास्तामध्ये कमी कॅलरी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वजन कमी करण्यात मदत होते. हे खाल्ल्याने तुमचे पोट भरलेले राहते आणि तुम्ही कमी खातात, ज्यामुळे वजन कमी होते.

Wheat Pasta Benefits
Corona New XEC Variant: कोरोनाचा नवा प्रकार 'XEC' झपाट्याने वाढतोय, जाणून घ्या लक्षणे अन् उपाय

रक्तातील साखर

गव्हापासून बनवलेल्या पास्तामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ज्यामुळे ते हळूहळू पचते आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. यामुळे दिवसभर ऊर्जावाण राहता.

स्नायूंचे आरोग्य

गव्हाच्या पास्तामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. प्रथिने स्नायू मजबूत होण्यास मदत करतात आणि वजन नियंत्रणात राहते. तसेच पचन सुरळित ठेवते.

हृदयाचे आरोग्य

गव्हापासून बनवलेल्या पास्तामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.