Weight Loss Tips : वजन झटक्यात कमी होईल, फक्त हा एक पदार्थ खाण्याची सवय लावून घ्या

No Diet, No Exercise तरीही होईल वजन कमी, फक्त एवढंच करा 
Weight Loss Tips
Weight Loss Tipsesakal
Updated on

Weight Loss Tips : चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते लठ्ठपणा हे अनेक आजारांचे मूळ आहे. अशा परिस्थितीत लठ्ठपणाकडे दुर्लक्ष केल्यास शरीरातील इतर आजारांचा धोका वाढतो. लठ्ठपणाचा त्रास असलेले लोक केवळ जिममध्ये जात नाहीत तर आहारावरही लक्ष केंद्रित करतात.

वजन कमी करायचे असेल तर डायट करा, हे खाऊ नका, ते खाऊ नका. त्यासोबत व्यायामही करा. दिवसातून तीन तास व्यायाम करा, व्यायामासाठी लवकर उठण्याचा आणि अपुऱ्या झोपेचा परिणाम कामावर होतो. त्यामुळेच लोक व्यायाम करायला नाही म्हणतात.

तुम्हीही वजन कमी करण्याचा विचार करत असाल. पण डायट आणि व्यायामाशिवाय ते शक्य होत नसेल तर तुम्हाला आम्ही एक भन्नाट आयडिया देणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय वजन कमी करता येणार आहे.

Weight Loss Tips
Morning drink for weight loss: नारळाच्या पाण्यात हा पदार्थ मिक्स करा, वजन झपाट्याने होईल कमी

ज्या लोकांकडे जिमला जाण्यासाठी वेळ नाही त्यांचे वजन कसे कमी होईल? इथे आम्ही तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही सहज वजन कमी करू शकता. ओबेसिटी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार बदाम खाल्ल्याने वजनही कमी होऊ शकते.

संशोधक काय म्हणतात?

युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांच्या मते, प्रथिनाशिवाय बदामामध्ये हेल्दी फॅट आढळते. हे खाल्ल्याने शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी वितळते. संशोधकांचे म्हणणे आहे की बदाम खाल्लेल्या काही लोकांचे वजन 7 किलोपर्यंत कमी झाले.

बदाम कसे फायदेशीर आहेत?

अँटिऑक्सिडंट्ससोबतच प्रथिनेसारखे अनेक पोषक घटक बदामामध्ये आढळतात. बदाम खाल्ल्याने शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवत नाही. याशिवाय बदाम खाल्ल्याने शरीर सक्रिय राहते. आम्ही तुम्हाला सांगतो की बदाम शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता देखील पूर्ण करतात. (Weight Loss Tips)

Weight Loss Tips
Weight Loss Tips दररोज सकाळी या बियांचे प्या पाणी, वजन घटेल व पचनप्रक्रियाही सुधारेल

असे खा बदाम

वजन कमी करण्यासाठी बदाम खाण्याची योग्य पद्धत देखील जाणून घेतली पाहिजे. आरोग्य तज्ञांच्या मते, 5-10 वयोगटातील मुलांनी दररोज 2-4 बदाम खावेत. 18-20 वर्षांच्या लोकांनी रोज 6-8 बदाम खावेत. तर, महिलांनी दररोज 12 बदाम खावेत.

या गोष्टी लक्षात ठेवा

बदाम खाण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. ज्या लोकांना बदामाची ऍलर्जी आहे त्यांनी आरोग्य तज्ञाचा सल्ला घेतल्यानंतरच ते खावे. याशिवाय बदाम जास्त प्रमाणात खाऊ नका. बदाम हे निसर्गात उष्ण असतात, त्यामुळे शरीराला आरोग्याच्या समस्याही होऊ शकतात. मात्र, या घरगुती उपायांसोबतच तुमची व्यायामाची दिनचर्याही पाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.