Moong Daal: लठ्ठपणा ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लठ्ठपणामुळे शरीराचा आकार बिघडतो आणि आजार देखील वाढतात. वजन कमी करण्यासाठी लोक जीम लावतात आणि व्यायाम करतात. तसेच डायटिंग देखील करतात. पण तरीही अपेक्षित परिणाम मिळत नाही.
वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही फॅन्सी डाएट प्लॅनचे पालन करण्याची गरज नाही. घरी बनवलेले साधे पदार्थ खाऊन तुम्ही सहज वजन नियंत्रणात ठेऊ शकता. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांच्या नियमित सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते. या गोष्टींमध्ये मूग डाळ देखील समाविष्ट आहे.
मूग डाळीमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असते. जे स्नायूंच्या विकासात तसेच वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. त्यात खूप कमी कॅलरी आणि उच्च फायबर सामग्री आहे, म्हणून ते वजन कमी करण्यास मदत करते. जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात मूग डाळ अनेक प्रकारे समाविष्ट करू शकता. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मुग डाळीचा आहारात कसा समावेश करावा हे जाणून घेऊया.