Healthy Fats Benefits निरोगी राहायचं असेल तर डाएटमध्ये हेल्दी फॅट्सचा करा समावेश, ऋजुता दिवेकरने सांगितले फायदे

Health Care News : डाएटमध्ये आपण काही हेल्दी फॅट्सचाही समावेश करू शकता, ज्यामुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते.
Healthy Fats Benefits
Healthy Fats BenefitsSakal
Updated on

बदलती जीवनशैली आणि व्यस्त वेळापत्रकातही लोक हल्ली आरोग्याबाबत खूप दक्षता बाळगताना दिसतात. बहुतांश लोक आहारात केवळ आरोग्यवर्धक पदार्थांचाच समावेश करतात. इतकंच नव्हे तर दिनचर्येत पारंपरिक उपचारांचाही समावेश करू लागले आहेत. 

पारंपरिक उपाय आरोग्यास लाभदायकच ठरतील, यात काही शंकाच नाही. म्हणूनच आजच्या काळात अनेकजण आजींनी सांगितलेले उपाय आजमावून पाहताहेत. तर दुसरीकडे काही लोक आहारात चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करणं टाळतात, कारण यामुळे शरीराचे वजन (benefits of healthy fats for weight loss) वाढते.

Healthy Fats Benefits
Dry Ginger Powder Benefits : ऋजुता दिवेकरकडून जाणून घ्या सुंठाचे फायदे व वापर करण्याची योग्य पद्धत

पण आहारतज्ज्ञांच्या माहितीनुसार, काही फॅट्स आरोग्यासाठी फायदेशीर असतात; म्हणून हे फॅट्सचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. प्रसिद्ध आहारातज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनीही सोशल मीडियावर हेल्दी फॅट्सबद्दलची माहिती सांगणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

Healthy Fats Benefits
Dragon Fruit Benefits: सकाळी रिकाम्या पोटी खा ड्रॅगन फ्रुट, मिळतील जबरदस्त फायदे

आहारात फॅट्सचा (benefits of healthy fats in diet) समावेश असणे आवश्यक का असते, याबाबतचे महत्त्व त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून फिटनेसप्रेमींना सांगितले. 

सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरच्या खास टिप्स  

आहारामध्ये काही हेल्दी फॅट्सचा समावेश करणं अत्यंत आवश्यक असते, असा सल्ला ऋजुता यांनी दिला आहे. आपले शरीर फॅट्सचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करत असते. म्हणून हेल्दी फॅट्सयुक्त खाद्यपदार्थांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

Healthy Fats Benefits
Curd Benefits For Health साखर की मीठ? दही कशासोबत खाणे ठरेल फायदेशीर, जाणून घ्या

हेल्दी फॅट्सयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास हाडे मजबूत होतात, हृदयाचे आरोग्य निरोगी राहते, मूड चांगला राहतो आणि अनेक आजारांपासून शरीराचे संरक्षण होण्यास मदत मिळते.  

ऋजुता दिवेकर यांना काही प्रश्नांना दिलेली उत्तर खालीलप्रमाणे

प्रश्न 1 : घाण्याच्या कच्च्या तेलाचे सेवन केल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर काही परिणाम होतो का? हृदयाच्या आरोग्यासाठी हे तेल चांगले असते का?

उत्तर -   ऋजुता दिवेकर यांनी सांगितले की, कच्च्या तेलाची फोडणी देऊन त्यामध्ये खिचडी, पुलाव, डाळ यासारख्या कित्येक पदार्थांमध्ये या तेलाचा वापर केला जाऊ शकतो. हा एक पारंपरिक तेलाचा प्रकार आहे आणि हे तेल कमी तापमानात काढले जाते.

यामुळे फॅटी अॅसिड्स, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक घटक तेलामध्ये टिकून राहतात. रिफाइंड भाज्या, भाताचे तूस यासारख्या इतर तेलांचा वापर केल्यास हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळू शकते.   

प्रश्न 2 : काजुचे सेवन करणं लाभदायक ठरेल?

या प्रश्नावर उत्तर देताना ऋजुता यांनी सांगितले की, ब्रेकफास्ट व दुपारच्या जेवणाच्या मधल्या वेळेत काजुचे सेवन करणं आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. पण काजू हेल्दी फॅट्सचा उत्तम स्त्रोत आहे.

अक्रोडमध्येही आरोग्यवर्धक घटकांचा खजिना आहे. यामध्ये खनिजे, जीवनसत्त्वे आणि अमिनो अॅसिड्स यासारख्या पोषणतत्त्वांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. अक्रोडच्या सेवनामुळे रात्रीच्या वेळेस झोप चांगली लागते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.