मोठ्या उत्सहात दिवाळीचा सण संपन्न झाला आहे. दिवाळीत आतिषबाजी, नवी खरेदी करून लोक फराळावर ताव मारतात. जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात तेही दिवाळीत फराळ खाण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत. कारण, इतरवेळी केलेल्या अन् दिवाळीत केलेल्या फराळाची चव वेगळी असते. त्यामुळे, दिवाळीचा फराळ सर्वच जण खात असतात.
पण, जे लोक वजन कमी करण्यासाठी जीव तोडून मेहनत करतात. त्यांना मात्र चकली,करंजी अन् लाडूवर ताव मारणं महागात पडू शकतं. काही मोजके पदार्थ खाल्ले तरी वजन वाढू शकतं. त्यामुळे दिवाळीनंतर वजन कमी करण्यासाठी मेहनत करावी लागते. (Weight Loss Tips)
तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर तुम्ही काही गोष्टी करायला हव्यात. तुम्ही काही मोजक्या गोष्टी करूनही वजन सहज कमी करू शकता. यासाठी तुम्हाला फार काही मेहनत घेण्याची आवश्यकता नाही. या काही सोप्या गोष्टी करून तुम्ही वजन सहज कमी करू शकता.
तुम्ही भूक लागली म्हणून एकाचवेळी खाणं टाळा. आधीच फराळाने वजन वाढलेलं असतं. त्यामुळे, सतत खाणं टाळा. तुम्ही थोड्या-थोड्या वेळाने खात रहा. यामुळे, वजन कमी व्हायला मदत होते.
प्रत्येकाने दिवसातील किमान ४५ मिनिटे व्यायाम करायला हवा, असे डॉक्टर सांगतात. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर दररोज व्यायाम करायला हवा. दिवसातील अधिक वेळ खाणे अन् झोपण्यात घालवल्यानंतर एखादा तास आपण व्यायामासाठी नक्कीच काढू शकतो.
दिवाळी फराळातील गोड पदार्थांमुळे वजन अधिक वाढतं. गोड पदार्थामुळे शरीरातील कॅलरी वाढतात. त्या कॅलरी बर्न होणं सोपं नसतं. त्यामुळे, तुम्ही दिवाळीनंतर गोड पदार्थ खाणं टाळा. यामुळे, तुमच्या शरीरातील कॅलरी अधिक वाढणार नाहीत. तसेच, वाढलेल्या कॅलरीही हळूहळू कमी होतील.
लोक ट्रेंड म्हणून व्यसनांच्या आहारी जातात. तर काही लोक आवड म्हणून मद्यपान करतात. पण, हे असे करणे वजन वाढीस कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे, मद्यपानापासून दूर रहा. मद्यपान करणे केवळ तुमच्या वजनावर परिणाम करत नाही. तर, तुमच्या शरीरासाठीही ते धोकादायक ठरू शकते.
पाणी पिणे वजन कमी करण्यासाठी फायद्याच ठरू शकते. तुम्ही जितके पाणी प्याल तितकेच तुमचे वजन कमी होईल. कारण, पाणी प्यायल्याने तुमचे शरीर हायड्रेड राहते आणि शरीराची ही स्थिती वजन कमी करण्यात फायदेशीर ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.