Weight Loss Tips : अननस हे एक अतिशय रसाळ फळ आहे जे कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि खनिजे यासारख्या पोषक घटकांचा साठा आहे. सामान्यत: लोकांना अननस कोशिंबीर किंवा रस म्हणून भिजवायला आवडते. याचे सेवन केल्याने तुमची पचनक्रिया चांगली राहते. पण तुम्हाला माहित आहे का की अननस वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते.
अशातच आज आम्ही तुमच्यासाठी अननस चहा बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. अननसमध्ये खूप कमी कॅलरी आणि कार्ब असतात, म्हणून अननस चहा आपली चरबी जाळण्यास उपयुक्त ठरतो. जर तुम्ही रोज 1 कप अननस चहाचे सेवन करत असाल तर तुम्ही वजन सहज नियंत्रित करू शकता, तर चला जाणून घेऊया अननस चहा कसा बनवावा.
अननस पौष्टिक का आहे ?
अननसात भरपूर पाणी (सुमारे 80%) असते. त्यामुळे ते उन्हाळ्यासाठी योग्य फळ आहे.
त्यात व्हिटॅमिन ए, सी, बी6 आणि के देखील आढळतात.
अननस देखील दाहक-विरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.
अननसात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात.
अननसात फॅटचे प्रमाण नाममात्र असते.
अननस मँगनीज, तांबे, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या अनेक खनिजांनी समृद्ध आहे.
अननस खाण्याचे फायदे
- तुमचे वाढते वजन कमी करण्यासाठी तुम्ही अननसचे सेवन करू शकता. कारण अननसमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. जे आपले वाढते वजन कमी करण्यासाठी मदत करते.
- तसेच रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी अननस किंवा अननसचा रस ही पिऊ शकता. ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
- अननसामध्ये व्हिटॅमिन ए आढळते. ते आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी खूप मदत आणि खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्ही अननसाचे सेवनही करू शकता.
- सर्दीच्या समस्येमुळे तुम्ही खूप त्रस्त असाल तर अशावेळी तुम्ही अननसाचा रसाचे सेवन करू शकता त्यामुळे तुम्हाला थोडा आराम मिळतो.
- अनेक जणांना मळमळ होण्याची समस्या जाणवत असते, या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही अननसाच्या रसाचे सेवन करू शकता.
अननस चहा बनवण्यासाठी साहीत्य
लिंबाचा रस
अननस रस
टि बॅग
पाणी
अननसाचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम एक पॅन घ्या.
मग त्यात पाणी घालून उकळून घ्या.
त्यानंतर हे पाणी एका कपमध्ये टाकावे.
मग त्यात एक टी बॅग टाकून बुडवून घ्या.
यानंतर साधारण ५-७ मिनिटे बुडवून ठेवा.
मग त्यात अननस आणि लिंबाचा रस घाला.
यानंतर थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवून थंड करून प्यावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.