Steps To Reduce Tummy Fat : नवीन वर्षात अनेक जण वजन कमी करण्याचा संकल्प करतात. त्यासाठी फार परिश्रमही घेत असतात. चालणे, व्यायाम करणे, जीम लावणे, डाएट करणे असे अनेक प्रकार केले जातात. ज्याचा परिणामही दिसतो. पण, पोट मात्र फारसं कमी होत नाही. पोट कमी करण्यासाठी काही विशेष परिश्रम घ्यावे लागतात. पण जीवनशैलीतल्या काही बदलांनी ते शक्या होऊ शकेल.
जास्तीत जास्त अॅक्टिव्ह रहा
झटपट वजन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त अॅक्टिव्ह राहणं आवश्यक असतं. सतत काही ना काही काम करत रहा. शक्य झाल्यास सकाळ संध्याकाळ व्यायाम करा.
स्ट्रीक्ट डाएट ऐवजी हेल्दी लाइफस्टाईल निवडा
जर तुम्ही स्ट्रीक्ट डाएट करण्याचा विचार करत असाल तर त्या ऐवजी कायमसाठी हेल्दी लाइफस्टाइल निवडा. यात तुम्ही जंक फूड खाण्याऐवजी हेल्दी फूड खा.
वेट लिफ्टींग ठरू शकतो फायदेशीर
जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचं असेल आणि मसल्स पण बनवायचे असतील तर तुम्हाला वेट लिफ्टींग फायदेशीर ठरू शकतं.
प्रोसेस्ड फूडपासून लांब रहा
शक्य तेवढं जंक फूडपासून लांब रहा. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळेल. बीपी आणि कोलेस्ट्रॉल पण संतुलीत राहतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.