Beauty Tips : कुठली क्रीम वा फेसवॉश नाही, तर तुम्ही एक महिना मध चेहऱ्याला लावला तर काय होईल?

Honey Benefits For kids : काही लोक त्यांच्या चेहऱ्याला सुंदर बनवण्यासाठी ऑनलाइन प्रोडक्ट शोधत असतात. पण, खरा उपाय तर आपल्या भारतीय आयुर्वेदात अन् तुमच्या स्वयंपाकघरात दडलेला आहे.
Beauty Tips
Beauty Tips esakal
Updated on

Honey is good for skin :  

चेहऱ्याचा रंग उजळायचा असो वा आपली त्वचा मऊ-मुलायम बनवायची असो, प्रत्येकजण डॉक्टरची औषधे वा जाहीरातीतील क्रिम्सचा वापर करतो. सध्या व्हायरल होणारे काही हॅक्सही सुंदर दिसण्यासाठी वापरले जातात. ज्यात कुठल्यातरी क्रिम घेऊन त्यात व्हिटामिन्स ईच्या गोळ्या टाकून ते चेहऱ्याला लावण्यास सांगितले जाते. पण त्याने खरंच फायदा होतो का, याचा विचार फार कमी लोक करतात.

चेहऱ्याची चमक कायम राहावी म्हणून अत्यंत महागड्या कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर केला जातो. काही लोक त्यांच्या चेहऱ्याला सुंदर बनवण्यासाठी ऑनलाइन प्रोडक्ट शोधत असतात. पण, खरा उपाय तर आपल्या भारतीय आयुर्वेदात अन् तुमच्या स्वयंपाकघरात दडलेला आहे. (Face Beauty Tips)

Beauty Tips
Beauty Tips : चेहरा उजळ अन् डोळ्यांभोवती काळी वर्तुळे, असं कसं चालेल, या उपायांनी वाढवा डोळ्यांच सौंदर्य

तुम्ही सर्वात आधी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, कुठलीही गोष्ट चिरंतन काळ टिकावी असे वाटत असेल तर त्यासाठी तात्पुरता उपाय करून चालत नाही. जर तुम्हाला तुमचा चेहरा उजळ आणि तो डागरहित बनवायचा असेल तर तुम्हाला ही परवडणारी गोष्ट सहज मिळेल. ती गोष्ट म्हणजे मध आहे.

एखादी क्रिम आठवडाभर लावून फरक जाणवला. तर, त्याने तुम्हाला तात्पुरता फरक पडेल. पण, आज आम्ही सांगणार असलेला उपाय हा कोणताही साईड इफेक्ट नसलेल्या मधाचा आहे. या मधाच्या पाण्याने अनेकांचा दिवस सुरू होतो. जर तुम्हाला हे मध चेहऱ्यावर लावून त्याचे फायदे करून घ्यायचे असतील तर हे नक्की वाचा.

मध चेहऱ्याला लावल्याने काय होईल?

मधामध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट असतात. याशिवाय, ते चेहरा हायड्रेट देखील करते. मधामध्ये अमिनो ॲसिड आणि व्हिटॅमिन बी 6 देखील चांगल्या प्रमाणात आढळतात. यामुळे चेहरा उजळतो. आणि चेहऱ्याच्या पोर्समध्ये अडकलेले इन्फेक्शन, घाणीचे कणही दूर होतात. यामुळेच मध लावल्याने चेहरा स्वच्छ दिसतो आणि संसर्ग दूर होऊन डागरहित चमकणारी त्वचा मिळते.

मध चेहऱ्यावर कसा लावावा ?

चेहऱ्यावर मध वापरण्यापूर्वी, सर्वप्रथम आपण आपला चेहरा चांगला धुवा. यानंतर हातावर मधाचे काही थेंब घ्या आणि बोटांच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर मध लावा. लक्षात ठेवा की तुम्हाला बोटे गोलाकार हालचालीत हलवावी लागतील जेणेकरून चेहऱ्याला मसाज करता येईल. जेव्हा मध चेहऱ्यावर चांगले शोषले जाते, तेव्हा अर्धा तास थांबा. यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा.

Beauty Tips
Raksha Bandhan Beauty Tips: रक्षाबंधनला चमकदार त्वचा हवीय? मग आजपासून करा बदाम तेलाचा 'असा' वापर

मधापासून फेसमास्क कसा बनवावा?

त्वचा घट्ट करण्यासाठी आणि टॅनिंग दूर करण्यासाठी देखील मध फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही मधामध्ये मुलतानी माती मिसळा. आणि थोडेसे कच्चे दूध घालून थोडा जाड फेसमास्क बनवा. हा मास्क स्वच्छ चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनंतर चेहरा धुवा. जास्त चोळून चेहरा धुणे टाळा. आठवड्यातून दोनदा हा पॅक वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा विशेष प्रभाव तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.