विमान प्रवासात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास Flight Attendant काय करतात?

काही लोकांनी विमानाने प्रवास केला असेल, पण अजूनही असे बरेच लोक असतील ज्यांनी कधी विमानात पाऊलही ठेवले नसतील.
Flight
Flightesakal
Updated on
Summary

विमानामध्ये प्रवाशाची तब्येत खराब झाल्यास, पहिल्यांदा एअर होस्टेस आणि फ्लाइट अटेंडंट त्या प्रवाशाला प्रथमोपचार सुविधा देतात. तसेच अशावेळी एखाद्याचा मृत्यू झाल्यावर काय केले जाते हे पाहूयात.

काही लोकांनी विमानाने (Flight) प्रवास केला असेल, पण अजूनही असे बरेच लोक असतील ज्यांनी कधी विमानात पाऊलही ठेवले नसतील. अशा परिस्थितीत जर तो पहिल्यांदा विमानाने प्रवास करत असेल तर तो अनुभव त्याच्यासाठी खूप मस्त आणि वेगळा असतो. विमान प्रवास लोकांसाठी रोमांचक असला तरी या प्रवासात काही समस्याही निर्माण होतात. अनेक वेळा विमान प्रवासादरम्यान लोकांचा मृत्यूही (Death in Flight) झाला आहे. चला तर मग जाणून घेऊयात विमानात प्रवास करताना एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाला तर त्यानंतर विमान कर्मचाऱ्यांचा तात्काळ प्रतिसाद कसा असतो.

Flight
जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रीक विमान विकसित केल्याचा रोल्स रॉइसचा दावा

डेली स्टार वेबसाइटच्या वृत्तानुसार, विमानात प्रवास करताना एखाद्या प्रवाशाची तब्येत बिघडली तर पहिल्यांदा एअर होस्टेस (Air hostess) आणि फ्लाइट अटेंडंट (Flight attendant) त्या प्रवाशाला प्राथमिक उपचार सुविधा (First aid facility) देतात. विमानात प्रवास करणार्‍या फ्लाइट अटेंडंट देखील असे प्रशिक्षण दिले जाते जेणेकरून ते आपत्कालीन परिस्थितीत औषधे किंवा CPR सारख्या गोष्टी देऊ शकतील.

विमानात एखाद्याचा मृत्यू झाल्यास काय होते?

विमानामध्ये एखाद्या व्यक्तीची तब्येत जास्त बिघडली तर पायलट जवळच्या विमानतळावर विमान उतरवतो जेणेकरून प्रवाशाचा जीव वाचू शकेल. पण विचार करा की एवढं करूनही विमानातच एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाला तर काय करणार? मग मृतदेह (Dead body) विमानाच्या शेवटी रिकाम्या जागेवर किंवा बिझनेस क्लासमध्ये हलवला जातो जेणेकरून ते नजरेआड राहिल. बिझनेस इनसाइडरशी बोलताना, फ्लाइट अटेंडंट एनटे लाँग म्हणाल्या की, त्या डेड बॉडीला ब्लँकेटने झाकले जाते जेणेकरून लोक डेड बॉडी पाहू शकणार नाहीत.

Flight
पहिल्यांदा विमान प्रवास कराताना 'हे' लक्षात ठेवा

महिलेने सांगितला तिचा वैयक्तिक अनुभव (Personal experience)

कोरा वेबसाइटवर तिचा अनुभव शेअर करताना एका महिलेने सांगितले की, ती लॉस एंजेलिसहून ऑकलंडला जात होती, तेव्हा वाटेत तिच्या पतीचा मृत्यू झाला. प्लेनच्या स्टीवर्डने त्याला पाहिले, नंतर फ्लाइटमध्ये प्रवास करणार्‍या डॉक्टरकडे तपासले ज्याने त्याला मृत घोषित केले. यानंतर त्या व्यक्तीचे शरीर ब्लँकेटने झाकण्यात आले. अनेक ठिकाणी विमानात मृत घोषित केले जात नसले, तरी लँडिंगनंतर त्यांची तपासणी केली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()