Beauty Blender : ब्युटी ब्लेंडर म्हणजे काय? ब्लेंडर वापरण्याची 'ही' योग्य पद्धत घ्या जाणून

ब्युटी ब्लेंडरमुळे आपल्या चेहऱ्यावरील मेकअप चांगल्या प्रकारे सेट होतो.
Beauty Blender
Beauty Blenderesakal
Updated on

Beauty Blender Tips : आजकाल साधा कार्यक्रम असो किंवा कोणत्याही पार्टीला जरी जायचे असेल तरी मेकअप शेकअप करण्यावर महिलांचा भर असतो. मागील काही वर्षांमध्ये मेकअप आणि मेकअपशी संबंधित असलेल्या प्रॉडक्ट्सची संख्या देखील वाढली आहे.

मेकअपमध्ये फाऊंडेशन, कन्सिलर, हायलायटर, लिपस्टिक, आयलायनर, मस्कारा आणि ब्युटी ब्लेंडर इत्यादी अनेक घटकांचा समावेश करण्यात येतो. या गोष्टींशिवाय मेकअप अधुरा वाटतो.

ब्युटी ब्लेंडरचा उपयोग हा चेहऱ्यावरील फाऊंडेशन, कन्सिलर ब्लेंड करण्यासाठी केला जातो. ब्युटी ब्लेंडरमुळे आपल्या चेहऱ्यावर मेकअप चांगल्या प्रकारे ब्लेंड होतो. आज आपण ब्युटी ब्लेंडर म्हणजे काय ? आणि त्याचा योग्य प्रकारे वापर कसा करायचा ? हे जाणून घेणार आहोत.

ब्युटी ब्लेंडर म्हणजे काय ?

ब्युटी ब्लेंडरला मेकअप स्पॉंज असे ही म्हटले जाते. चेहऱ्यावरील फाऊंडेशन, कन्सिलर, क्रीम किंवा लिक्विड मेकअप चांगल्या प्रकारे ब्लेंड करण्यासाठी ब्युटी ब्लेंडरचा वापर केला जातो.

ब्युटी ब्लेंडर अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये विविध प्रकारेच शेप्स देखील मिळतात. बाजारात अनेक प्रकारचे ब्युटी ब्लेंडर उपलब्ध आहेत. परंतु, जर तुम्ही स्वस्तातला एखादा ब्युटी ब्लेंडर खरेदी कराल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Beauty Blender
Bridal Makeup Skincare Tips : परफेक्ट ब्रायडल मेकअप हवायं ? मग फॉलो करा हे स्किनकेअर रूटीन

कारण, स्वस्त ब्लेंडरमध्ये चांगल्या प्रतीचा कापूस वापरला जाण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे, ते चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे काम करेलच याची शाश्वती नसते. शिवाय, चेहऱ्यावरील मेकअप यामुळे नीट सेट होणार नाही.

त्यामुळे, चांगल्या प्रतीचा आणि उत्तम क्वालिटीचा ब्युटी ब्लेंडर किंवा स्पंज खरेदी करा. जेणेकरून चेहऱ्यावरील मेकअप चांगल्या प्रकारे ब्लेंड होऊ शकेल आणि छान मेकअप सेट होण्यास मदत होईल. चांगल्या स्पंजमुळे त्वचेवर कोणतीही जळजळ किंवा पुरळ येणार नाहीत.

ब्युटी ब्लेंडरचा वापर कसा करायचा ?

  • चेहऱ्यावर ब्युटी ब्लेंडरचा वापर करण्यापूर्वी ते आधी ओले करून पिळून घ्या. नंतर, त्याचा वापर करा.

  • जर तुम्ही ब्लेंडर ओले आणि पिळून न घेता वापरले तर ते चुकीचे ठरते. यामुळे चेहऱ्यावर पुरळ येऊ शकतात.

  • ओले ब्लेंडर चेहऱ्यावर ड्युई आणि स्ट्रीक-फ्री फिनिशिंग देते. त्यामुळे, नेहमी ब्लेंडर ओला करून आणि पिळूनच त्याचा वापर चेहऱ्यावर करा.

  • चेहऱ्यावर फाऊंडेशन चांगल्या प्रकारे ब्लेंड करायचे असेल तर ब्लेंडरचा वापर अवश्य करा.

  • डोळ्यांखालील काळी वर्तुळे लपवण्यासाठी कन्सिलरचा वापर केला जातो. अशावेळी कन्सिलर चांगल्या प्रकारे लावण्यासाठी ब्युटी ब्लेंडरचा वापर करा.

Beauty Blender
How to Apply Concealer : कन्सिलर म्हणजे काय ? कन्सिलर लावण्याची ‘ही’ योग्य पद्धत घ्या जाणून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.