Benefits Of Face Serum : फेस सीरम म्हणजे काय? चेहऱ्याला लावण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे घ्या जाणून

फेस सीरममध्ये उपलब्ध असलेले सक्रिय घटक आपल्या चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरतात.
Benefits Of Face Serum
Benefits Of Face Serumesakal
Updated on

मेकअप आणि स्किनकेअर प्रॉडक्ट्समध्ये सातत्याने नवनवीन उत्पादनांची भर पडत आहे. खास करून स्किनकेअर प्रॉडक्ट्स आणि मेकअप प्रॉडक्ट्समध्ये वाढ झाली आहे. केमिकलसोबतच काही आयुर्वेदिक उत्पादनांची मागणी महिलावर्गाकडून वाढली आहे.

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी फेस सीरम वापरण्यावर महिला भर देत आहेत. परंतु, फेस सीरम म्हणजे नेमकं काय? आणि फेस सीरम आपल्या त्वचेवर लावण्याचे नेमके फायदे आहेत तरी काय ? हे प्रश्न अनेक महिलांना पडतात. आज आपण या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.

फेस सीरम म्हणजे काय ?

  • फेस सीरम हे अतिशय लाईटवेट असते. थोडक्यात सांगायचे झाल्यास ते मॉईश्चरायझरसारखे असते आणि ते वजनाने अतिशय हलके अर्थात लाईटवेट असते. मॉईश्चरायझरपेक्षा चांगल्या प्रकारे ते आपल्या त्वचेवर काम करते.

  • लहान-लहान मॉलेक्यूल्सपासून हे वॉटर बेस्ड फेस सीरम बनवले जाते. शिवाय, ते त्वचेमध्ये लवकर शोषले जाते आणि त्वचेला आतून ओलावा देण्याचे काम करते. व्हिटॅमिन सी, हायलुरॉनिक अ‍ॅसिड, ग्लायकॉलिक अ‍ॅसिड इत्यादी अनेक प्रकारचे फेस सीरम आजकाल मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

  • या फेस सीरममध्ये उपलब्ध असलेले सक्रिय घटक आपल्या चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे, अनेक महिला त्यांच्या स्किनकेअर रूटीनमध्ये फेस सीरमचा समावेश आवर्जून करतात. काही फेस सीरम हे त्वचेवर अ‍ॅंटीएजिंगचे ही काम करतात.

Benefits Of Face Serum
Scrubs For Oily Skin : तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात? मग तांदूळ आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ होममेड स्क्रब्स

फेस सीरम लावण्याचे फायदे कोणते ?

प्रत्येक त्वचेच्या प्रकारानुसार फेस सीरमचे अनेक प्रकार पहायला मिळतात. त्यामुळे, त्यांचे त्वचेला होणारे फायदे ही निरनिराळे असतात. त्यापैकी काही फायदे खालीलप्रमाणे

त्वचेवर ग्लो येतो

जर तुम्हाला चमकदार त्वचा हवी असेल किंवा त्वचेवर ग्लो हवा असेल तर, व्हिटॅमीन सी युक्त असलेले फेस सीरम त्वचेवर अवश्य लावा. कारण, व्हिटॅमिन सी हे चेहऱ्याच्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. हे सीरम लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो आणि त्वचा घट्ट होण्यास मदत मिळते.

त्वचा हायड्रेटेड राहते

चेहऱ्यावर फेस सीरम लावल्यामुळे आपली त्वचा हायड्रेटेड राहते. त्वचेला आतून पोषण मिळते.

Benefits Of Face Serum
Face Packs for Dry Skin : कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात?गुलाबजल आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ होममेड फेसपॅक्स

स्किन रिपेअर होण्यास मदत मिळते

काही ब्युटी तज्ज्ञांच्या मते चेहऱ्यावर फेस सीरम लावल्याने चेहऱ्याची त्वचा आतून रिपेअर होते. शिवाय, काही फेस सीरममध्ये व्हिटॅमीन बी 3 असते जे तेलकट त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे.

पुरळांची समस्या दूर करते

अनेकांच्या चेहऱ्यावर मुरूम किंवा पुरळ येतात. जर तुम्ही या समस्यांमुळे त्रस्त असाल तर रेटिनॉलयुक्त फेस सीरम चेहऱ्यावर लावा. हे एक अँटी-एजिंग फेस सीरम आहे, जे त्वचेवरील पुरळ, मुरूम आणि ब्लॅकहेड्सच्या समस्या दूर करण्यास मदत करते. 

Benefits Of Face Serum
Hair Serum Tips : हेअर सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती ? केसांना होणारे ‘हे’ फायदे घ्या जाणून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.