Float Therapy In Summer : उष्णतेमुळे हैराण आहात? मग, ‘फ्लोट थेरपी’ आहे मदतीला.! जाणून घ्या काय आहे हा प्रकार?

Float Therapy In Summer : वातावरणातील उकाडा वाढला की याचा आपल्या आरोग्यावर ही परिणाम होतो.
Float Therapy In Summer
Float Therapy In Summeresakal
Updated on

Float Therapy In Summer : मे महिन्याला सुरूवात झाली आहे, आणि उन्हाचा तडाखा देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वातावरणातील उकाडा वाढला की याचा आपल्या आरोग्यावर ही परिणाम होतो. उष्णतेमुळे आरोग्यावर परिणाम तर होतोच शिवाय, तणाव देखील वाढू शकतो.

जर तुम्हाला देखील उष्णतेमुळे तणाव जाणवत असेल तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला एका थेरपीबद्दल सांगणार आहोत. या थेरपीचे नाव आहे फ्लोट थेरपी. ही थेरपी केल्याने तुम्हाला ताण-तणावापासून आराम मिळेल आणि शांत झोप येईल. ही थेरपी उन्हाळ्यात प्रत्येकाने करायलाच हवी. ही फ्लोट थेरपी नेमकी काय आहे? आणि याचे फायदे काय आहेत? ते जाणून घेऊयात.

Float Therapy In Summer
Swimming Benefits : रोज स्विमिंग केल्यास तुमच्या शरीराला मिळतील 5 जबरदस्त फायदे, एकदा वाचाच

फ्लोट थेरपी काय आहे?

फ्लोट थेरपी ही खर तर स्विमिंग बेस्ड थेरपी आहे. या थेरपीमध्ये एखाद्या व्यक्तीला स्विमिंग टॅंकमध्ये पाठीच्या आधारे पाण्यात रहावे लागते. परंतु, या थेरपीमध्ये व्यक्तीला पोहण्याची गरज नाही. उलट पाण्याने भरलेल्या स्विमिंग टॅंकमध्ये एखाद्या फ्लोटिंग ट्यूबवर आरामशीर स्थितीमध्ये स्थिर रहायचे असते.

साधारण अर्धा तास ते १ तासापर्यंत पाठीच्या आधारे आरामशीर झोपून राहिल्यानंतर तुमची मानसिक आणि शारिरीक स्थिती उत्तम राहते. तणाव दूर होतो आणि तुम्हाला रिलॅक्स वाटते. या फ्लोट थेरपीचे आरोग्याला इतर अनेक फायदे होतात. कोणते आहेत हे फायदे? चला तर मग जाणून घेऊयात. (what is Float Therapy)

हृदयासाठी लाभदायी

फ्लोट थेरपी केल्याने रक्तदाब आणि हृदयाची गती नियंत्रणात राहण्यास मदत होते. अशा परिस्थितीमध्ये ही फ्लोट थेरपी हृदयासाठी फायदेशीर ठरते. हृदयाशी संबंधित असलेल्या समस्या दूर करण्यासाठी ही थेरपी अतिशय उपयुक्त ठरते. (beneficial for heart)

मांसपेशींच्या वेदनांपासून आराम मिळतो

फ्लोट थेरपी केल्याने शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. शिवाय, स्नायूंचा ताण आणि वेदनांपासून आराम मिळतो. त्यामुळे, ही थेरपी अधिक श्रम करणाऱ्या  लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. ही थेरपी केल्याने स्नायूंमधील तणाव दूर होतो आणि शरीराला आराम मिळतो. (Relieves muscle pain)

तणाव दूर होतो

तणाव कमी करण्यासाठी फ्लोट थेरपी अतिशय फायदेशीर आहे. तणावापासून आराम मिळवण्यासाठी आणि चांगल्या झोपेसाठी ही फ्लोट थेरपी उपयुक्त ठरते. ज्यांना झोपेच्या समस्या असतील किंवा ताण-तणावाची समस्या असेल अशा लोकांनी या फ्लोट थेरपीची जरूर मदत घ्यावी. (reduce stress)

Float Therapy In Summer
Parenting Tips : उन्हाळ्यात मुलांना स्विमिंग शिकवण्याचा विचार करताय? मग 'या' गोष्टींची घ्या खास काळजी

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.