HD Makeup Tips : मेकअप हा विषय महिलांचा अत्यंत जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. मेकअपमध्ये आता विविध ट्रेंड्सची आणि प्रकारांची सातत्याने भर पडताना दिसत आहे. HD कॅमेरा, HD फोटोनंतर आता HD मेकअपची ही भलतीच क्रेझ सर्वत्र पहायला मिळत आहे.
मागील काही वर्षांपूर्वी हा मेकअप फक्त बॉलिवूड आणि हॉलवूडपर्यंत मर्यादित होता. कित्येक अभिनेत्री हा एचडी मेकअप खास फोटोशूटसाठी करायच्या. मात्र, आता हा HD मेकअप सामान्य महिलांपर्यंत येऊन पोहचला आहे. अनेक महिला, तरूणी त्यांच्या लग्नात, खास फंक्शनसाठी या एचडी मेकअपचा वापर आवर्जून करतात.
आज आपण HDमेकअप म्हणजे काय? आणि या HD मेकअपचे प्रकार कोणते आहेत ? ते आपण जाणून घेणार आहोत.
HD मेकअप म्हणजे हाय डेफिनेशन (High Defination) मेकअप होयं. या मेकअपच्या मदतीने तुमचा मेकअप नॅच्युरल ठेवला जातो. या मेकअपमुळे चेहऱ्यावरील डार्क स्पॉट्स, काळी वर्तुळे, पिंपल्स आणि सुरकुत्या देखील लपवल्या जातात. या मेकअपमुळे तुमची त्वचा फ्लॉलेस दिसते आणि तुमचा चेहरा अधिक उठून दिसतो.
शिवाय, हा मेकअप अधिककाळ टिकतो आणि केकी वाटत सुद्धा नाही. या मेकअपचे फिनिशिंग चेहऱ्याला वेगळाच लूक देते. HD मेकअपची सुरूवात 6000 रूपयांपासून होते. HD मेकअपमधील प्रॉडक्ट्स आणि त्याची क्वालिटी यावर ही या मेकअपची किंमत ठरते. या मेकअपचा खर्च साधारण 30 हजारांपर्यंत जाऊ शकतो.
Airbrush HD मेकअप हा या HD प्रकारातला प्रमुख प्रकार आहे. या प्रकारामध्ये एअरब्रश मशिनचा वापर केला जातो. या ब्रशचा वापर करून हा मेकअप चेहऱ्यावर लावला जातो. या मेकअपमुळे तुमच्या चेहऱ्याला स्मूथ आणि फ्लॉलेस फिनिशिंग मिळते.
ज्या महिलांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांच्यासाठी हा Mineral HD मेकअप अगदी परफेक्ट आहे. या प्रकारच्या मेकअपमुळे तुमच्या त्वचेला छान चमक मिळते. हा मेकअप बराच काळ टिकून राहतो.
Liquid HD मेकअप हा एक प्रकारचा फाऊंडेशन मेकअप आहे. हा मेकअप चेहऱ्याला शोभून दिसतो. या प्रकारच्या मेकअपमध्ये ब्रश किंवा स्पंजचा वापर केला जातो, आणि त्यांच्या मदतीने हा मेकअप केला जातो. या प्रकारचा फाऊंडेशन मेकअप आपल्याला फूल कव्हरेज देतो आणि चेहऱ्याला ग्लॉसी लूक देतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.