Makeup Brush : मेकअप ब्रशची योग्य निवड करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

मेकअप ब्रशच्या मदतीने मेकअप छान प्रकारे सेट केला जातो.
Makeup Brush
Makeup Brushesakal
Updated on

Makeup Brush : आजकाल मेकअपची तरूणाईमध्ये भलतीच क्रेझ निर्माण झाली आहे. महिला आणि तरूणींमध्ये मेकअपबद्दल आकर्षण वाढत चालले आहे. छोटेमोठे फंक्शन्स, घरगुती कार्यक्रम, सण-समारंभ अशा कार्यक्रमांसाठी आवर्जून मेकअप केला जातो.

प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग, मॅटर्निटी फोटोशूट आणि लग्नामध्ये, तर मेकअप आर्टिस्टला भरपूर मागणी असते. घरच्या घरी सुद्धा मेकअप केला जाऊ शकतो. मात्र, मेकअप कसा करायचा ? आणि त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात हे माहित असायला हवे.

मेकअपमध्ये अनेक वस्तूंचा समावेश केला जातो. या वस्तूंमध्ये मेकअप ब्रश हा अतिशय महत्वाचा घटक आहे. मेकअप ब्रशच्या मदतीने मेकअप छान प्रकारे सेट केला जातो. आज आपण मेकअप ब्रशची निवड कशी करावी ?  आणि मेकअप ब्रशची निगा कशी राखावी ? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

मेकअप ब्रशची निवड कशी करावी ?

  • मेकअप ब्रशची निवड करण्यापूर्वी तो तुमच्या गरजेंनुसार आणि तुम्ही वापरत असलेल्या मेकअपचा प्रकार लक्षात ठेवून करा.

  • जर तुम्ही क्रीम किंवा लिक्विड मेकअपच्या उत्पादनांचा वापर करत असाल तर तुम्ही सिंथेटिक ब्रशची निवड करू शकता.

  • मेकअप ब्रशची निवड करताना सर्वात आधी तुमच्या त्वचेवर ब्रशचा वापर करून बघा. त्या ब्रशचे ब्रिस्टल्स (ब्रशचे केस) तपासून घ्या. ब्रिस्टल्स मऊ असावेत, याची खात्री करा.

  • मेकअप ब्रशने त्वचेवर ओरखडे पडता कामा नये, याची विशेष काळजी घ्या. त्यानुसारच मेकअप ब्रशची निवड करा.

  • तुमच्या चेहऱ्याच्या आकाराप्रमाणेच ब्रशचा आकार असावा, त्यामुळे ब्रश खरेदी करताना हे तपासून घ्या.

Makeup Brush
How to Apply Concealer : कन्सिलर म्हणजे काय ? कन्सिलर लावण्याची ‘ही’ योग्य पद्धत घ्या जाणून
  • आय-लायनर किंवा लिप लायनरसाठी नेहमी लहान आकाराच्या ब्रशचा वापर करा.

  • मेकअप करताना चेहऱ्यावर पावडरचा वापर करताना नेहमी मोठ्या ब्रशचा वापर करा. यासाठी खास मोठा ब्रश खरेदी करा.

  • सिंथेटिक ब्रश हे लिक्विड आणि क्रीम मेकअपच्या उत्पादनांसाठी योग्य आहेत. तुमच्याकडे जर लिक्विड आणि क्रीम मेकअपची उत्पादने असतील तर सिंथेटिक ब्रश खरेदी करा.

  • नेहमी उच्च प्रतीच्या ब्रशेसची निवड करा. कारण, ते मेकअपसाठी फायदेशीर असतात आणि त्याचा त्वचेवर कोणताही परिणाम होत नाही.

Makeup Brush
Beauty Blender : ब्युटी ब्लेंडर म्हणजे काय? ब्लेंडर वापरण्याची 'ही' योग्य पद्धत घ्या जाणून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.