Pitra Dosh: पितृदोष म्हणजे काय? का लागतो पितृदोष जाणून घ्या कारणे आणि उपाय

शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असते, तेव्हा त्याच्या जीवनकाळात सर्व प्रकारची संकटं येत असतात.
Pitra Dosh
Pitra DoshEsakal
Updated on

हिंदू धर्मशास्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात, यालाच आपण पितृदोष म्हणतो. ज्योतिष शास्त्रानुसार, आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकी एक म्हणजे पितृदोष.

ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो.

दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्ध विधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात.या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात. शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असते, तेव्हा त्याच्या जीवनकाळात सर्व प्रकारची संकटं येत असतात. इच्छा असूनही, माणूस त्यातून बाहेर पडू शकत नाही.

चला आज जाणून घेऊया या पितृदोष का होतो याची कारणे आणि पितृदोष दूर करण्यासाठी उपाय…

Pitra Dosh
Vastu Tips: तुमच्या घरातील अनेक वास्तूदोष दूर करण्याच काम करते तुरटी...

या कारणांमुळे पितृ दोष लागू शकतो?

1) धार्मिक स्थळातील म्हणजे एखाद्या मंदिराजवळील पिंपळ किंवा वडाचे झाड तोडल्यास पितृ दोष लागू शकतो.

2) तुम्ही तुमच्या पितरांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने सुध्दा तुम्हाला पितृ दोष लागू शकतो.

3) तुम्ही जर तुमच्या पुर्वजांना म्हणजे पितरांना विसरले किंवा त्यांचा अपमान केला तरी देखील तुम्हाला पितृ दोष लागू शकतो.

4) तुम्ही जर का सापाची चुकी नसताना साप मारला तरी देखील तुम्हाला पितृदोष लागू शकतो.

Pitra Dosh
श्रावणमध्ये आढळला दुर्मिळ ''चापड्या साप''

पितृदोष दूर करण्यासाठीचे उपाय कोणते आहे ?

पितृदोष दूर करण्यासाठी महागडे उपाय सांगण्यात येतात पण कोणी एवढं खर्च करण्यात सक्षम नसेल तर काही सोपे आणि स्वस्त उपाय करून याचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो.

1) कुंडलीत पितृ दोष असल्यास त्या व्यक्तीने घरातील दक्षिण दिशाच्या भिंतीवर आपल्या स्वर्गीय नातेवाइकांचा फोटो लावून त्यावर हार चढवावा आणि प्रार्थना करावी.

2) स्वर्गीय नातेवाइकांच्या निर्वाण तिथीवर गरजू लोकांना किंवा ब्राह्मणाला भोजन करवावे. भोजनात मृतात्म्याचा आवडता पदार्थ सामील करावा.

3) त्यांच्या तिथीवर शक्य असल्यास गरीब लोकांना कपडे आणि अन्न दान करावे.

4) पिंपळाच्या झाडावर दुपारी जल, फूल, अक्षता, दूध, गंगाजल, आणि काळे तीळ चढवावे आणि स्वर्गीय नातेवाइकांचे स्मरण करून त्याचा आशीर्वाद घ्यावा.

5) सोमवारी सकाळी अंघोळ करून बिना चप्पल शिव मंदिरात जाऊन आकड्याचे 21 फुलं, कच्ची लस्सी, बेलपत्र वाहून शिवाची पूजा करावी. 21 सोमवार हा नियम केल्याने पितृदोषाचा प्रभाव कमी होतो.

6) पूर्वजांच्या नावावर मंदिर, शाळा, धर्मशाळा निर्माण करण्यासाठी हातभार लावल्याने किंवा गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत केल्यानेही लाभ मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.