Health Care : शरीर तंदुरूस्त ठेवण्यासाठी फायदेशीर आहे रेट्रो वॉकिंग, जाणून घ्या त्याचे ‘हे’ फायदे

रोज सकाळी किंवा संध्याकाळी चालायला जाणे हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. ज्या लोकांना जिममध्ये जाऊन घाम गाळायला आवडत नाही, अशा लोकांसाठी चालणे हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे.
Health Care
Health Care esakal
Updated on

Health Care : रोज सकाळी किंवा संध्याकाळी चालायला जाणे हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. ज्या लोकांना जिममध्ये जाऊन घाम गाळायला आवडत नाही, अशा लोकांसाठी चालणे हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. आतापर्यंत तुम्ही चालण्याच्या व्यायामाबद्दल फार ऐकले असेल. मात्र, तुम्ही कधी रेट्रो वॉकिंगबद्दल ऐकले आहे का?

रेट्रो वॉकिंग म्हणजे जुना काळ किंवा जुन्या काळातील एखादा प्रकार नव्हे तर रेट्रो वॉकिंग म्हणजे उलटे चालणे होय. तुमच्या शरीराचे आरोग्य असो किंवा मानसिक आरोग्य असो त्यासाठी रेट्रो वॉकिंग अतिशय फायदेशीर आहे. आज आपण रेट्रो वॉकिंगचे फायदे काय आहेत? ते जाणून घेणार आहोत.

Health Care
Mediterranean Diet : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असणारे मेडिटेरिनियन डाएट आहे तरी काय? जाणून घ्या ‘हे’ फायदे

रेट्रो वॉकिंग करण्याचे फायदे खालीलप्रमाणे :

कॅलरीज बर्न होतात

तुम्हाला हे जाणून कदाचित आश्चर्य वाटेल. परंतु, नियमित रेट्रो वॉकिंग केल्यामुळे आपल्या शरीरातील भरपूर कॅलरीज बर्न्स होतात. सामान्यपणे चालण्याच्या तुलनेत रेट्रो वॉकिंगमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतात.

रेट्रो वॉकिंग केल्यामुळे प्रत्येक मिनिटाला आपल्या शरीरातील ४० टक्के कॅलरीज बर्न्स होतात. शिवाय, आपल्या शरीराची पचनक्षमता मजबूत राहण्यास मदत होते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी रोज सकाळी रेट्रो वॉकिंग करणे फायद्याचे ठरते.

हाडांसाठी आहे फायदेशीर

नियमितपणे रेट्रो वॉकिंग केल्यामुळे आपल्या शरीरातील हाडे आणि सांधे मजबूत होण्यास मदत होते. हाडे आणि सांध्यांना मजबूती मिळाल्यामुळे आपल्या शरीराला दुखापतीचा धोका हा कमी राहतो. शिवाय, शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.

जेव्हा आपण उलटे चालतो त्यावेळी आपल्या पायांवर आणि गुडघ्यांवर सामान्यपणे चालण्याच्या तुलनेत कमी दाब पडतो. त्यामुळे, पायांमध्ये कोणत्याही वेदना होत नाहीत.

हृदयाला ठेवते निरोगी

जेव्हा आपण उलटे चालतो, तेव्हा त्यावेळी आपल्या शरीराला जास्त ऊर्जेची गरज भासते आणि हृदयाचे ठोके मोठ्या प्रमाणात वाढतात. परिणामी, फुफ्फुसांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा सुरू होतो. या सगळ्यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य मजबूत राहण्यास मदत होते.

पाठदुखीपासून मिळतो आराम

बराच काळ स्क्रिनसमोर बसून काम केल्यामुळे कंबर आणि पाठदुखीची समस्या निर्माण होते. ही समस्या आजकाल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकाच स्थितीमध्ये बराच वेळ बसल्यामुळे पाठीच्या कण्यावर दाब येतो. त्यामुळे, पाठ दुखते. या स्थितीमध्ये तुम्ही नियमितपणे रेट्रो वॉकिंग केल्यामुळे पाठदुखीची समस्या कमी होण्यास मदत होते.

Health Care
Health Care : वजन कमी करण्यासाठी लाभदायी आहे मखाना, जाणून घ्या 'हे' आरोग्यदायी फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.